केंद्रीय अर्थसंकल्पात नाशिकला मेट्रोची भेट - Sitaraman budget 2092 cr for Nashik Metro Project. Central Budget | Politics Marathi News - Sarkarnama

केंद्रीय अर्थसंकल्पात नाशिकला मेट्रोची भेट

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 1 फेब्रुवारी 2021

अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी आज संसदेत अर्तसंकल्पाच्या सादरीकरणाला सुरवात केली. त्यात त्यांनी नाशिकसह नागपूर, कोचिन, बंगळूऱू या सहरांच्या मेट्रोच्या विस्तारीकरणाची घोषणा केली. नाशिकच्या मेट्रोसाठी दोन हजार 92 कोटींची तरतूद करण्यात आली.

नाशिक : अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी आज संसदेत अर्तसंकल्पाच्या सादरीकरणाला सुरवात केली. त्यात त्यांनी नाशिकसह नागपूर, कोचिन, बंगळूऱू या सहरांच्या मेट्रोच्या विस्तारीकरणाची घोषणा केली. नाशिकच्या मेट्रोसाठी दोन हजार 92 कोटींची तरतूद करण्यात आली. त्यामुळे नाशिक शहराच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला गती मिळण्याचा मार्ग मोकळा झाला.

यंदाच्या केंद्रीय अर्थसंकल्पात रेल्वेच्या विस्तारीकरणासाठी विविध तरतुदींची घोषणा झाली. यामध्ये सार्वजनिक वाहतुकीच्या विस्तारासाठी अठरा हजार कोटींची घोषणा करण्यात आली आहे. यातील दोन हजार 92 कोटींचे गिफ्ट नाशिकला मिळाले आहे. त्यामुळे भविष्यात विस्तारणारे व विकासाला चालना असलेले शहर म्हणून नाशिक शहराचे स्थान वर सरकेल. त्याचा उद्योग, व्यापार व बांधकाम क्षेत्रालाही चालना मिळेल.

नाशिकला यापुर्वी भारतीय जनता पक्षाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टायरबेस मेट्रोची घोषणा केली होती. दोन वर्षापूर्वी त्याची घोषणा झाली होती. विधानसभेच्या निवडणुकीआधी त्याबाबत विधीमंडळात सादरीकरण करण्यात आले होते. मात्र त्यासाठी महापालिकेची कोणतिही तयारी नव्हती. त्यासाठी आर्थिक तरतुद देखील झालेली नव्हती. त्यामुळे हा प्रकल्प टिकेचा विषय ठरला होता. आता मात्र थेट केंद्रीय अर्थसंकल्पातच त्याची घोषणा झाली. त्यामुळे नाशिककरांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.  
....
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख