त्र्यंबकेश्वर, काळाराम मंदिरांची दारे भाविकांसाठी जयघोषात उघडली! - Shree Kalaream Temple Reopens in Nashik | Politics Marathi News - Sarkarnama

त्र्यंबकेश्वर, काळाराम मंदिरांची दारे भाविकांसाठी जयघोषात उघडली!

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 16 नोव्हेंबर 2020

`कोरोना`चा संसर्ग रोखण्यासाठी शासनाने केलेल्या प्रतिबंधात्मक उपायांमुळे राज्यातील सर्व धार्मिकस्थळे बंद करण्यात आली होती. आठ महिन्यांपासून बंद असलेली धार्मिकस्थळे आज पाडव्याच्या मुहुर्तावर उघडण्यात आली.

नाशिक  : `कोरोना`चा संसर्ग रोखण्यासाठी शासनाने केलेल्या प्रतिबंधात्मक उपायांमुळे राज्यातील सर्व धार्मिकस्थळे बंद करण्यात आली होती. आठ महिन्यांपासून बंद असलेली धार्मिकस्थळे आज पाडव्याच्या मुहुर्तावर उघडण्यात आली.

यावेळी भाविकांनी मंदिरांत दर्शन घेऊन आनंद व्यक्त केला. विशेषतः त्र्यंबकेश्वर ज्योर्तिलींग मंदीर आणि नाशिक शहरातील काळाराम मंदिरात सकाळी घंटानाद करीत पूजा झाली. 

यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दोन दिवसांपूर्वी घोषणा केली होती. जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी यांसदर्भात नियमावली जाहिर केली होती. त्यानुसार दररोज जास्तीत जास्त एक हजार व दर तासाला ८०  भाविकांनाच  प्रवेश दिला जाणार आहे. प्रवेश केलेल्या भाविकांचे दर्शन होईपर्यंत अन्य भाविकांना प्रवेश दिला जाणार नाही. देवस्थान, व्सूत, मुर्तींना स्पर्श करण्यास मनाई असेल यांसह विविध नियम आहेत. या पार्श्वभूमीवर रविवारी विश्वस्त मंडळाची बैठक होऊन त्यात दर्शनाचे व मंदिर उघडण्याचे नियोजन करण्यात आले आहे. 

आज सकाळी मंदिर उघडणार असल्याने भाविकांनी गर्दी केली होती. घोषणा व घंटानाद करीत मंदिराची दारे उघडण्यात आली. भाविकांनी दर्शन घेतल्यानंतर आनंद व्यक्त करीत शासनाच्या घोषणेचे स्वागत केले. नाशिक शहरात काळाराम मंदिराची दारे उघडण्यात येऊन विधीवत पूजा झाली. यावेळी मोठ्या संख्येने बाविक तसेच राजकी पक्षांचे कार्यकर्ते उपस्थित होते. 
...
 

https://developers.facebook.com/docs/plugins/embedded-posts/?prefill_hre...

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख