शिवसेनेच्या नाशिक मॉडेलची राज्यभर चर्चा होईल

जनसेवा हेच शिवसेनेचे खरे ब्रीदवाक्य आहे. त्याचीच कास धरत नाशिक महानगरात कोविड काळात सुरू असलेले मदतकार्य, रक्तदान शिबिरे व वृक्षारोपण आदी विविध उपक्रम स्तुत्य असून, राज्यभरात या नाशिक मॉडेलची चर्चा असल्याचे प्रतिपादन शिवसेना उपनेते व उत्तर महाराष्ट्र समन्वयक रवींद्र मिर्लेकर यांनी केले.
Nerlikar Ravindra
Nerlikar Ravindra

नाशिक : जनसेवा हेच शिवसेनेचे खरे ब्रीदवाक्य आहे. त्याचीच कास धरत नाशिक महानगरात कोविड काळात सुरू असलेले मदतकार्य, रक्तदान शिबिरे व वृक्षारोपण आदी विविध उपक्रम स्तुत्य असून, राज्यभरात या नाशिक मॉडेलची चर्चा असल्याचे प्रतिपादन शिवसेना उपनेते व उत्तर महाराष्ट्र समन्वयक रवींद्र मिर्लेकर यांनी केले. 
नाशिक दौऱ्यावर आले असता शिवसेनेतर्फे झालेल्या विविध कार्यक्रमांचे उद्‌घाटन मिर्लेकर यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. 

नाशिकच्या शिवसैनिकांशी माझा जवळून परिचय आहे. कोणतेही काम हाती घेतले की ते त्यात आपले सर्वस्व पणास लावतात. गेल्या पाच ते सहा महिन्यांपासून तर शिवसैनिकांनी विविध कामांचा धडाका लावला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरू केलेली कोविड सेंटर, गरजूंना विविध स्तरावरून केलेली मदत या सर्व बाबी निश्चितच कौतुकास्पद असून, जनसेवेचा वसा असाच कायम ठेवून शिवसेनेला अभिप्रेत असे कार्य सतत सुरू ठेवा, असेही मिर्लेकर म्हणाले. 

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत शहरात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रामणात वाढला. सामान्य नागरिक, रुग्ण व त्यांचे नातेवाईक त्यामुळे त्रस्त झाले होते. रुग्णालयात प्राणवायू तसेच खाटांची मोठी टंचाई झाली होती. यावेळी सिडको येथे शिवसेनेचे महानगरप्रमुख, नगरसेवक बडगुजर यांनी कोविड सेंटर सुरु केले. त्याचा अनेक रुग्णांना लाभ झाला. शहराच्या अन्य भागात शिवसेनेने रुग्णवाहिका, रुग्णांना दवाखान्यात दाखल करणे, विविध साहित्य वाटप व अन्य प्रकारे मदत केली होती. त्याचाही श्री. मिर्लेकर यांनी आवर्जुन उल्लेख केला. 

यावेळी महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी शहरात शिवसेनेतर्फे सुरु असेलल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. शहरात भविष्यातही आणखी नवीन उपक्रमांद्वारे जनतेची सेवा आम्ही करीत राहू, असे सांगितले. रक्त संकलनाचे एक हजार १६५ पिशव्यांचे लक्ष्य दहा दिवस आधीच गाठल्याचेही बडगुजर म्हणाले. 

महिला आघाडी पदाधिकारी फैमिदा रंगरेज यांनी सार्वजनिक वाचनालय (नेहरू गार्डन) तसेच शिवाजी भोर यांनी द्वारका येथे आयोजित केलेल्या रक्तदान शिबिराचे श्री. मिर्लेकर यांच्या हस्ते उद्‌घाटन झाले. मुंबई नाका येथे विशाल गाडेकर यांच्या शिवभोजन थाळी केंद्राचेही त्यांनी उद्‌घाटन केले. ज्येष्ठ नगरसेवक सूर्यकांत लवटे, युवा सेना महानगर अधिकारी गणेश बनकर यांनी देवळाली गाव येथे आयोजित केलेल्या वृक्षारोपण कार्यक्रमास मिर्लेकर यांची प्रमुख उपस्थिती होती. माजी मंत्री बबनराव घोलप, शिवसेना जिल्हाप्रमुख विजय करंजकर, महिला आघाडी जिल्हा संपर्क संघटक रंजनाताई नेवाळकर, डॉ. स्नेहल माडगे, महापालिका विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते, माजी जिल्हाप्रमुख सुनील बागूल, दत्ता गायकवाड, माजी आमदार वसंतराव गिते, मनपा गटनेते विलास शिंदे, ज्येष्ठ शिवसैनिक राजू लवटे, युवासेना जिल्हाप्रमुख राहुल ताजनपुरे, भाविसे जिल्हा संघटक वैभव ठाकरे, शिवसेना विधानसभा प्रमुख प्रवीण तिदमे, माजी महानगरप्रमुख महेश बडवे, युवासेना जिल्हा चिटणीस गणेश बर्वे, नितीन चिडे, महानगर संघटक योगेश बेलदार, 
...

हेही वाचा...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com