भाजप नेते सतीश सोनवणेंच्या कार्यालयावर शिवसेनेचा हल्ला?

भारतीय जनता पक्षाचे महापालिकेतील सभागृह नेते सतीश सोनवणे यांच्या कार्यालयावर आज सकाळी कार्यकर्त्यांनी हल्ला करून मोडतोड केली. गेल्या चार दिवसांत त्यांच्या कार्यालयावरील हा दुसरा हल्ला आहे. याबाबत श्री. सोनवणे यांनी शिवसेनेचे नेते सागर देशमुख यांच्या सांगण्यावरून हल्ला झाल्याची तक्रार केली आहे.
Satish Sonawne
Satish Sonawne

नाशिक : भारतीय जनता पक्षाचे महापालिकेतील सभागृह नेते सतीश सोनवणे यांच्या कार्यालयावर आज सकाळी कार्यकर्त्यांनी हल्ला करून मोडतोड केली. गेल्या चार दिवसांत त्यांच्या कार्यालयावरील हा दुसरा हल्ला आहे. याबाबत श्री. सोनवणे यांनी शिवसेनेचे नेते सागर देशमुख यांच्या सांगण्यावरून हल्ला झाल्याची तक्रार केली आहे. 

भाजपचे श्री. सोनवणे आणि शिवसेनेचे नेते सागर देशमुख यांच्यात स्थानिक पाळीवर राजकीय वाद आहे. ते प्रतीस्पर्धी असल्याने त्यांच्या समर्थकांत सातत्याने असे वाद होत असतात. आज सकाळी त्याची पुनरावृत्ती झाल्याने यावेळी उपस्थित असलेले कर्मचारी व कार्यकर्ते घाबरून पळून गेले. सभागृहनेते सतीश सोनवणे यांच्या संपर्क कार्यालयावर आज दुपारी एकला १० ते १५ जणांच्या टोळक्याने तुफान दगडफेक केली. त्यानंतर त्यांनी संपूर्ण कार्यालय उध्वस्त केले. त्यांच्या महापालिकेच्या वाहनाची देखील तोडफोड करण्यात आली. 

याबाबत पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे.  हल्ला करणारे  सर्व जण शिवसेनेचे नेते सागर देशमुख यांचे समर्थक असल्याची माहिती सोनवणे यांनी दिली आहे. श्री सोनवणे यांच्या म्हणण्यानुसार त्यांच्या केबल व अन्य व्यवसायानिमित्त जमा झालेले पैसे देखील गायब झाले आहेत. पोलिस अधिकाऱ्यांनी कार्यालयाला भेट दिली. 

दरम्यान दोन दिवसांपूर्वी देखील रात्रीच्या सुमारास देशमुख आणि इतर तिघांनी येथे येऊन कर्मचाऱ्यांना धमकी दिल्याचा प्रकार घडला होता.  दुसऱ्या दिवशी रात्री श्री सोनवणे यांना मोबाईल वरून शिवीगाळ केली होती. त्यानंतर संतापलेल्या सोनवणे यांनी देखील देशमुख यांनी लावलेल्या बॅनरवर लाथ मारत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. देशमुख यांनी लावलेले बॅनर्स फाडल्याचे आणि त्यांच्या कार्यालयात देखील दगडफेक झाल्याचे व्हिडीओ व्हायरल झाले होते. मात्र हे कुणी केले याचा संदर्भ लागत नव्हता. त्या वादातुनच आज दुपारी ही  तोडफोड झाल्याची चर्चा आहे. 

दरम्यान पोलिसांनी याबाबत कठोर भूमिका घेण्याची मागणी श्री. सोनवणे व भाजपच्या कार्यकर्त्यांनी केली. महापौर सतीश कुलकर्णी यांच्यासह भाजपच्या नगरसेवक आणि पदाधिकार्यांनी पोलिस ठाण्यात ठिय्या दिला. गुंडगिरीचा निषेध केला. संबंधीतांवर कठोर कारवाईची मागणी या पदाधिकाऱ्यांनी केली.
...


 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com