शिवसेनेचे एकहाती सत्तेचे ध्येय पूर्ण करूच! 

म्हसरूळ, मेरी आणि पंचवटी परिसरात शिवसेनेची ताकद वाढली आहे. एकहाती सत्ता हेच शिवसेनेचे खरे ध्येय असून, त्यामुळेच शाखा आणि बूथ प्रमुखांची जबाबदारी वाढली आहे. आगामी महापालिका निवडणुकीत पक्षाचे जास्तीत- जास्त उमेदवार निवडून आणून इतिहास घडवा, असे आवाहन शिवसेना महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी केले.
Sudhakar Badgujar
Sudhakar Badgujar

नाशिक : म्हसरूळ, मेरी आणि पंचवटी परिसरात शिवसेनेची ताकद वाढली आहे. एकहाती सत्ता हेच शिवसेनेचे खरे ध्येय असून, (Shivsena will single handedly win NMC election) त्यामुळेच शाखा आणि बूथ प्रमुखांची जबाबदारी वाढली आहे. (Now Booth leaders responsiblity inrease) आगामी महापालिका निवडणुकीत पक्षाचे जास्तीत- जास्त उमेदवार निवडून आणून इतिहास घडवा, असे आवाहन शिवसेना महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर (Sudhakar Badgujar) यांनी केले. 

प्रभाग एकमधील सर्व शाखा आणि बूथ प्रमुखांची बैठक म्हसरूळच्या गावरान हॉटेल येथे झाली. या वेळी ते बोलत होते. व्यासपीठावर माजी आमदार वसंत गिते, माजी जिल्हाप्रमुख दत्ता गायकवाड, महिला आघाडीच्या शोभा मगर, विधानसभा संघटक विशाल कदम, भाविसे जिल्हा संघटक वैभव ठाकरे, लक्ष्मी ताठे, नगरसेवक सुनील गोडसे, राजेंद्र वाकसरे आदी उपस्थित होते. 

आगामी महापालिका निवडणुका म्हणजे शिवसेनेसाठी एकप्रकारे सत्त्वपरीक्षा आहे. शिवसेनेचे विचार आणि पक्षाची ध्येयधोरणे जनतेपर्यंत पोचवून पक्ष संघटना अधिक मजबूत करावी व जास्तीत- जास्त आणि विशेष करून युवा आणि महिला वर्गाला मोठ्या प्रमाणात पक्षात आणण्यासाठी कसब पणास लावा, असे आवाहनही बडगुजर यांनी केले. शिवसेनेतर्फे १२ जुलैपासून राबविण्यात येत असलेल्या शिवसंपर्क अभियानाची माहिती दत्ता गायकवाड आणि वसंत गिते यांनी विशद केली. महाआघाडी सरकारने हाती घेतलेले विविध निर्णय जनतेपर्यंत पोचवा, असे आवाहनही त्यांनी केले.

या वेळी शाखा आणि बूथ प्रमुखांच्या विविध शंकांचे निरसन श्री. बडगुजर यांनी केले. सूत्रसंचालन समन्वयक सुनील निरगुडे यांनी केले. सुनील जाधव यांनी आभार मानले. 
...
हेही वाचा...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com