सदस्य नोंदणीतून शिवसेना भाजपची कोंडी करणार? - Shivsena will challange BJP through membership drive. Nashik Politics | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

दहावी व बारावीच्या परीक्षा पुढे ढकलल्या : शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची घोषणा. याशिवाय सीबीएसई, आयसीएसई आदी बोर्डांनीही त्या पुढे ढकलाव्यात अशी राज्य सरकारची सूचना
Breaking - दहावी-बारावीच्या परिक्षा पुढे ढकलल्या

सदस्य नोंदणीतून शिवसेना भाजपची कोंडी करणार?

सरकारनामा ब्युरो
रविवार, 28 फेब्रुवारी 2021

महाविकास आघाडीच्या कामांमुळे जनमानसात शिवसेनेविषयी आस्था निर्माण झाली आहे. मुख्यमंत्री आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार राज्यात संघटनात्मक विस्ताराला चालना देण्यात येणार आहे.

नाशिक : महाविकास आघाडीच्या कामांमुळे जनमानसात शिवसेनेविषयी आस्था निर्माण झाली आहे. मुख्यमंत्री आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार राज्यात संघटनात्मक विस्ताराला चालना देण्यात येणार आहे. त्याचा भाग तसेच राज्यातील अनुकूल वातावरणाच्या पार्श्‍वभूमीवर नाशिक शहर व जिल्ह्यात पाच लाख नवीन सदस्यांची नोंदणीचे उदिष्ट निश्‍चित केले आहे. सर्व पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी ते साध्य करावे, असे आवाहन संपर्कप्रमुख भाऊसाहेब चौधरी यांनी केले. 

शिवसेना सदस्य नोंदणी अभियानाचे उद्‌घाटन त्यांच्या हस्ते शिवसेना भवनमध्ये झाले. या वेळी ते बोलत होते. ते म्हणाले, की महाविकास आघाडी सरकारचे नेतृत्व करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाचा ठसा उमटला आहे. त्यांचे हात बळकट करायचे असतील, तर जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यापर्यंत शिवसेना बळकट झाली पाहिजे. भाजप आपला एक नंबरचा प्रतिस्पर्धी असून, त्या पक्षाचा ढोंगीपणा जनतेसमोर आणण्यासाठी शिवसैनिकांनी कंबर कसावी. भारतीय जनता पक्षाचा खोटारडेपणा लोकांसमोर आली आहे. हा पक्ष देशात आणि समाजात भ्रम निर्माण करुन लोकांची दिशाभूल करीत आहे. आज जनता विविध प्रश्‍नांनी बेजार झाली आहे. महागाई, बेरोजगारी, सामाजिक स्वास्थ्य, महिलांची सुरक्षा यांपासून तर अनेक प्रश्‍नांनी जनता त्रस्त आहे. या प्रश्‍नांची निर्मिती व त्याची जबाबदारी फक्त भाजपने राबविलेल्या धोरणात आहे. या प्रश्‍नांकडील लक्ष अन्यत्र वळविण्यासाठी भाजप सोशल मिडीया व केंद्रातील सत्तेच्या माध्यमातून विविध यंत्रणांचा गैरवापर करीत आहे. त्याला आता सगळेच कंटाळले आहेत. त्यामुळे शिवसेना महाराष्ट्रात भाजपाला धडा शिकवेल. 

यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख विजय करंजकर यांनी सदस्य नोंदणी मोहिमेचे उद्दिष्ट साध्य करण्याचे आश्‍वासन दिले. महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी पक्ष विस्तारासाठी केलेल्या कामाची माहिती सादर करताना आगामी महापालिका निवडणुकीत महापालिकेवर शिवसेनची एकहाती सत्ता आपण आणणारच, असा निर्धारही व्यक्त केला. यावेळी विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते, माजी आमदार योगेश घोलप, भारतीय विद्यार्थी सेनेचे जिल्हा संघटक वैभव ठाकरे, माजी महानगर संघटक योगेश बेलदार, उपमहानगरप्रमुख सचिन बांडे, रमेश उघडे आदी उपस्थित होते. 

महापालिका निवडणुकीची तयारी 
सदस्य नोंदणीच्या निमित्ताने शिवसेनेने शहरात व जिल्ह्यात महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीची तयारी सुरु केली आहे. त्यामुळे शहरातील 122 प्रभागांतील शिवसेनेचे विद्यमान नगरसेवक आणि इच्छुक उमेदवारांना सदस्य नोंदणीच्या माध्यमातून जनसंपर्काची मोहीम हाती घेतली जाणार आहे. त्यामुळेच सध्या शिवसेनेचे सदस्य व शाखा दोन्हींचा विस्ताराचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. यानिमित्ताने भाजपने विविध आघाड्यांची कार्यकारीणी जाहीर करण्याचा धडाका लावला आहे. भाजपने आतापर्यंत वीस व्यवसाय व सामाजिक घटकनिहाय कार्यकारीणी घोषीत केली आहे. त्यांच्या कार्यकारीणीची संख्या शेकड्यात असते. त्यामुळे त्याला सदस्य नोंदणीतून शिवसेना उत्तर देणार आहे. त्यात कोण यशस्वी होते? हे लवकरच स्पष्ट होईल. 
...

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख