विजय करंजकरांमुळे देवळालीवर शिवसेनेची पकड घट्ट?

राज्यपाल नियुक्त विधान परिषद सदस्यांची नियुक्ती करतांना शिवसेनेने भगूरचे माजी नगराध्यक्ष विजय करंजकर यांनी संधी दिली. त्यामुळे शिवसेना देवळाली मतदारसंघ आणि महापालिका दोन्हींत संघटनात्मक विस्ताराचे उद्दीष्ट घेऊन वाटचाल करीत असल्याचे स्पष्ट होते. त्यात किती यश येते हे वर्षभरातच स्पष्ट होईल.
विजय करंजकरांमुळे देवळालीवर शिवसेनेची पकड घट्ट?

नाशिक : राज्यपाल नियुक्त विधान परिषद सदस्यांची नियुक्ती करतांना शिवसेनेने भगूरचे माजी नगराध्यक्ष विजय करंजकर यांनी संधी दिली. त्यामुळे  शिवसेना देवळाली मतदारसंघ आणि महापालिका दोन्हींत संघटनात्मक विस्ताराचे उद्दीष्ट घेऊन वाटचाल करीत असल्याचे स्पष्ट होते. त्यात किती यश येते हे वर्षभरातच स्पष्ट होईल.

देवळाली मतदारसंघातून यंदा राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या सरोज अहिरे यांनी शिवसेनेचा पराभव केला. त्यामुळे नाशिक शहरावरील शिवसेनेच्या वर्चस्वाला हादरा बसला होता. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर ही राजकीय मांडणी शिवसेनेला अडचण निर्माण करणारी होती. श्री. करंजकर यांना विधान परिषदेवर नियुक्त करुन शिवसेना ही उणीव भरुन काढत आहे. यानिमित्ताने महापालिका व नाशिकचा ग्रामीण भाग दोन्हींत संपर्क असलेला आमदार या भागाला मिळेल. 

देवळाली विधानसभा मतदारसंघ 1990 पासून 2019 पर्यंत सलग तीस वर्षे शिवसेनेचे माजी मंत्री बबन घोलप यांच्याबाजुने राहिला. कधी काळी कॉंग्रेस पक्षाचे वर्चस्व असलेल्या या परिसरात 1972 मध्ये कॉंग्रेसने (बंडखोर अपक्ष (कै) निवृत्ती गायधनी) कॉंग्रेसला (अधिकृत उमेदवार (कै) बाळासाहेब देशमुख) यांना पराभूत केले. त्यानंतर 1978 पासून कधीच हा मतदारसंघ येथे कॉंग्रेसला जिंकता आला नाही. हे चित्र नुकत्याच 2019 मध्ये झालेल्या निवडणूकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या सरोज अहिरे यांनी विद्यमान आमदार योगेश घोलप यांचा पराभव केला. या भागात महापालिकेचे एकोणीस नगरसेवक आहेत. शहरालगतचा ग्रामीण भाग असल्याने राजकीयदृष्ट्या या मतदारसंघाला महत्व आहे. खासदार हेमंत गोडसे, माजी मंत्री बबन घोलप, माजी आमदार योगेश घोलप आणि संभाव्य विधान परिषद सदस्य विजय करंजकर यांसह ग्रामीण भागातील विविध सरपंच असा शिवसेनेकडे राजकीय लवाजमा आहे. त्यामुळे पक्षविस्तारासाठी शिवसेना नव्या दमाने पावले टाकील, अशी स्थिती आहे. 

महाविकास आघाडीने सरकारने शुक्रवारी बारा विधान परिषद सदस्यांची यादी मान्यतेसाठी राज्यपालांना सादर केली. त्यात शिवसेनेने विजय करंजकर, चंद्रकांत रघुवंशी व राष्ट्रवादी कॉंग्रेसने माजी मंत्री एकनाथ खडसे अशा उत्तर महाराष्ट्रातील तिघांना संधी दिली. एका अर्थाने सध्याचे सरकार नाशिक विभागाला लाभदायीच ठरले आहे. श्री. करंजकर शिवसेनेचे जिल्हाप्रमुख असले तरीही अध्यात्मातील अभ्यास, किर्तनकार म्हणूनही त्यांची ओळख आहे. त्यामुळे कला व सांस्कृतिक क्षेत्रातून त्यांच्या नावाची शिफारस करण्यात आली. 

राज्यपाल भगतसिंग कोश्‍यारी यांनी शासनाच्या यादीवर अद्याप शिक्कामोर्तब केलेले नाही. तरीही राज्यपाल- राज्य सरकार यांच्यातील संघर्ष टाळण्यासाठी यादी अंतिम केली जाईल, असा कयास आहे. त्यामुळे श्री. करंजकर आमदार होणार याची केवळ अधिकृत घोषणाच शिल्लक आहे. त्यांच्या समर्थकांत, शिवसेनेते त्यामुळे उत्साहाचे वातावरण आहे. त्यांच्या नियुक्तीने विधानपरिषदेत शिवसेना व नाशिकची ताकद वाढेल. जिल्ह्यात शिवसेनेचे नरेंद्र दराडे, किशोर दराडे हे आणखी दोन सदस्य आहेत. दोन वर्षांपुर्वी विधानपरिषदेत निवडून गेले आहेत. आता राज्यपाल नियुक्त कोट्यातून विजय करंजकर प्रतिनिधित्व करणार आहे. ते आक्रमक संघटक व वक्ते आहेत. त्यामुळे शहरात पक्ष विस्तारासाठी त्याचा चांगलाच उपयोग पक्षाला होईल. शिवसेनेला आपले बलस्थान राखण्यासाठी ही नियुक्ती लाभदायी ठरु शकते. 
... 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com