नाशिक : त्याला पाहिले, एैकले की `तो`कोण आहे? राजकीय पक्षाचा कार्यकर्ता, नेता, गायक की अभिनेता? असे अनेक प्रश्न तुम्हाला पडू शकतात. त्याच्याशी बोललात, तर गोंधळ उडेल, कारण त्यालाही सांगता येणार नाही. कारण तो आहे स्मृतिभंश झालेला शिवसेना कार्यकर्ता. त्याला फक्त एकच आठवते, शिवसेनेचे गीत. हे गीत तो सतत गुणगुणत असतो. मुड आला तर गातो. त्यामुळे त्याला भेटलात, तर त्याच्यात मन गुंतल्याशिवाय राहणार नाही.
एकेकाळी कार्यकर्त्यांच्या गळ्यातील ताईत बनलेले अकोला जिल्ह्यातील एक कट्टर शिवसैनिक आजमितीस नाशिकच्या रस्त्यांवर स्वरचित शिवसेना गिते गातांना बघावयास मिळत आहेत. वृद्धापकाळ व स्मृतिभ्रंशाच्या आजाराने त्यांच्यावर ही वेळ आणली आहे. दरम्यान, आपल्या जन्मभूमीत जाण्यास व्याकुळ असलेले हे वयोवृद्ध कार्यकर्ते लॉकडाउनमुळे नाशिकमध्ये अडकुन पडले आहेत.
दिलीप खुशीराम शर्मा (वय ७०) असे त्यांचे नांव असून, ते राऊतवाडी (अकोला) येथील रहिवासी आहेत. लॉकडाउनमुळे नाशिकमध्ये अडकलेले असतानाच स्मृतिभ्रंशामुळे ते स्वरचित शिवसेना गिते गात रस्त्यांवरून फिरत आहेत. विशेष म्हणजे, अशाही परिस्थितीत त्यांना भेटल्यानंतर भल्या-भल्यांच्या भुवया उंचावल्याशिवाय राहात नाहीत. केवळ गॉडगिफ्ट असल्यामुळे आपण उत्तम गीतकार असल्याचे ते सांगतात. त्यांनी शिवसेनेवर व गजानन महाराजांवर उत्तमोत्तम गीत रचना केलेल्या असून, त्याचे सुंदर पद्धतीने गायनही ते करतात. त्यांनी लिहिलेल्या शिवसेनेवरील गीतांमुळे माजी राज्यमंत्री गुलाबराव गावंडे हेे देखील त्यांचे फॅन आहेत. एवढेच नव्हे तर, त्यांचे एक गीत पंकज उधास यांनीदेखील गायलेले असल्याचा दावा ते करतात. कोणत्याही परिस्थितीत आपल्याला गावी परत जायचे असल्याचाही ते आवर्जून उल्लेख करतात.
याविषयी बातमी प्रसिद्ध झाल्यावर अनेकांना त्याच्याविषयीची उत्सुकता वाढली. त्याचा शोध घेतला. शिवसेनेच्या अनेक कार्यकर्ते, पदाधिकारी त्याच्या मदतीसाठी उत्सुक आहे. त्यांनी त्याबाबत विचारणाही केली. मात्र हा एकलकोंडा त्यातून सुटका करीत, पुन्हा आपल्याच विश्वात रमतो. जणू शिवसेनेचे गीत हेच त्याचे विश्व आहे. त्यातच तो रमतो.
---
श्री. शर्मा यांचे आवडते शिवसेना गीत
शिवसेना यह जो बनी है सफल
‘गुलाब’ कि मेहनत है यह लगन |
बालासाहेब के नक्षोकदम पे चलता है,
अब तो यह सारा जीवन ॥१॥
शिवसेना के दिल में यही अरमान,
भगवा झेंडा रखेगा तिरंगे की शान ।
माँ भवानी का लेकर चलो वरदान,
शिवसेना का यही है अंजाम॥२॥
....
https://scontent.fpnq6-1.fna.fbcdn.net/v/t39.2365-6/12726927_46073809745...

