माजी आमदार अनिल कदम पिंपळगावं बाजार समितीत ताकदीने लढणार! 

निफाड मतदारसंघात झालेल्या 45 ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेनेचे सर्वाधीक 217 सदस्यांनी विजय मिळवला. पारंपारिक विरोधी गावासह 28 हुन अधिक गावामध्ये शिवसेनेचा भगवा फडकला. आता पिंपळगाव बसवंत बाजार समितीच्या निवडणुकीच्या तयारीला लागलो आहे.
Anil Kadam
Anil Kadam

ओझर : निफाड मतदारसंघात झालेल्या 45 ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेनेचे सर्वाधीक 217 सदस्यांनी विजय मिळवला. पारंपारिक विरोधी गावासह 28 हुन अधिक गावामध्ये शिवसेनेचा भगवा फडकला. आता पिंपळगाव बसवंत बाजार समितीच्या निवडणुकीच्या तयारीला लागलो आहे. त्यात ताकदीने उतरुन बाजार समिती काबीज करु असा विश्वास शिवसेनेचे माजी आमदार अनिल कदम यांनी सांगितले.  

ओझर सोसायटीच्या सभागृहात ग्रामपंचायत निवडणुकीत विजयी झालेल्या उमेदवारांचा मेळावा व सत्कार समारंभ श्री. कदम यांच्या उपस्थितीत झाला. यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले, निफाड हा शिवसेनेच्या विचाराचा मतदारसंघ आहे हे ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालातून अधोरेखित झाले आहे.  पिंपळगांव बसवंत बाजार समितीच्या आगामी निवडणुकीसाठी ग्रामपंचायतीचे निकाल हे शिवसेनेला बळ देणारे आहेत. बाजार समिती निवडणुकीत मी स्वतः उमेदवारी करेन. सक्षम उमेदवारांचा पॅनेलल निर्माण करुन ती निवडणुक ताकदीने लढणार आहे असे रणशिंग त्यांनी फुंकले. 

कदम पुढे म्हणाले की, अपार मेहनत घेऊन निफाड मतदारसंघाचा सर्वांगीण विकास साधला होता. मात्र विधानसभा निवडणुकीत अनपेक्षीत अपयश आले. यातुन तुम्ही अन मी खचलो नाही. खचणार देखील नाही. पुन्हा एकदा राजवैभव मिळण्यासाठी ग्रामपंचायतींचे निकाल ही नांदी आहे. त्याचा ट्रेलर आगामी पिंपळगांव बाजार समितीत दिसणार आहे. 

अनिल कदम हेच नेते
ज्येष्ठ नेते भास्करराव बनकर म्हणाले की, शिवसेनेचा विजय विरोधकांना धडकी भरविणारा आहे. जनतेने टाकलेला विश्‍वास विकासातुन सार्थ ठरवावा. अनिल कदम हे आमदार नसले तरी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे निकटवर्तीय आहेत. शासकीय योजना, वित्त आयोगाचा निधी, मुलभुत योजना गावापातळीवर पोहचविण्यासाठी त्यांची निश्‍चीतच मदत होईल.

यावेळी ज्येष्ठ नेते भास्करराव बनकर, जिल्हा परिषद सदस्य दीपक शिरसाठ, तालुका प्रमुख सुधीर कराड, आशिष मोगल, केदु गवळी, अनिरूध्द पवार, अशोक निफाडे, अमोल जाधव, भाऊ घुमरे, दौलत कडलग, उमेश मोरे, रोहीदास गाडे, शरद खालकर, भाऊसाहेब कमानकर, शहाजी राजोळ, अंबादास जामकर, देवेंद्र काजळे, दत्तु भुसारे आदी उपस्थित होते.
...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com