शिवसेनेच्या सर्व आमदारांना भाजपशी युती हवी आहे? - Shivsena MLA wants natural Alliance with Shivsena, State politics | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

पुण्यातील हॉटेल सायंकाळी 7 पर्यंत सुरू राहणार : अजित पवारांच्या बैठकीत निर्णय

शिवसेनेच्या सर्व आमदारांना भाजपशी युती हवी आहे?

सरकारनामा ब्युरो
रविवार, 20 जून 2021

आमदार प्रताप सरनाईक यांनी शिवसेनेने भारतीय जनता पक्षाशी युती करावी असे पत्र लिहून शिवसेनेच्या नेत्यांच्या मनातील भावनेला वाट करून दिली आहे. शिवसेनेच्या स्थानिक कार्यकर्त्यांनाही महाविकास आघाडी नको आहे. त्यामुळे लवकरच सर्वच आमदार अशी भूमिका घेऊ शकतात, असा दावा भाजपचे नेते प्रविण दरेकर यांनी म्हटले आहे. 

मुंबई : आमदार प्रताप सरनाईक यांनी शिवसेनेने भारतीय जनता पक्षाशी युती करावी असे पत्र लिहून (Shivsena MLA wrote a letter that shivsen should make alliance with BJP)  शिवसेनेच्या नेत्यांच्या मनातील भावनेला वाट करून दिली आहे. शिवसेनेच्या स्थानिक कार्यकर्त्यांनाही महाविकास आघाडी नको आहे. (He blaim On Congress, NCP for injusice with Shivsena)  त्यामुळे लवकरच सर्वच आमदार अशी भूमिका घेऊ शकतात, असा दावा भाजपचे नेते प्रविण दरेकर (Pravin Darekar) यांनी म्हटले आहे. 

आमदार सरनाईक गेले अडीच महिने गायब होते. `इडी`ने त्यांच्यावर कारवाई केली होती. त्यानंतर विजनवासात होते. मतदारसंघात फलक लागल्यावर काल ते प्रकट झाले होते. आज त्यांनी हे पत्र दिले. या पत्रात त्यांनी केंद्रीय यंत्रणा त्रास देत आहेत, असे विधान देखील केले आहे. त्यामुळे पत्राची पार्श्वभूमी हा देखील चर्चेत आहे. यसंदर्भात एका वृत्तवाहिनीवरील चर्चेत श्री. दरेकर सहभागी झाले होते. 

यासंदर्भात श्री. दरेकर म्हणाले, महाविकास आघाडी झाली, तेव्हा शिवसेनेच्या नेत्यांचा भाजपवर राग होता. त्यातून कॅांग्रेस, राष्ट्रवादी कॅांग्रेस व शिवसेनेची महाविकास आघाडी झाली. ही अनैसर्गिक आघाडी आहे. त्यामुळे ती टिकु शकत नाही. हे सरकार टिकणार नाही. गेल्या दिड वर्षात त्यांच्या दोन मंत्र्यांना राजीनामे द्यावे लागले आहेत. त्यांनी जनतेला काय दिले?. त्याचाही विचार होईलच. त्यामुळेच शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांत त्याबाबत नाराजी आहे. 

कॅांग्रेसने स्वबळाची भाषा केली आहे. राष्ट्रवादी कॅांग्रेस वेगळीच भूमिका घेत आहे. या तिन्ही पक्षांच आलबेल नाही. त्यामुळे नेत्यांत असुरक्षितता आहे. खेड पंचायत समितीत राष्ट्रवादीने राज्यात सत्तेत एकत्र असताना शिवसेनेच्या सभापतीवर अविश्वास ठराव आणला. ठाण्यामद्ये जितेंद्र आव्हाड शिवसेनेचे कार्यकर्ते फोडत आहेत. तीथे महापालिकेत शिवसेनेची सत्ता आहे. त्यामुळे कार्यकर्ते नाराज आहेत.

राज्यात अनेक ठिकाणी असेच पडसाद उमटत आहेत. समित्यांचे वाटप व अन्य विषयांवर तिन्ही पक्षात एकमत होत नाही. त्यामुळे शिवसेनेच्या आमदारांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमवेत बैठक घेतली होती. हे चित्र सगळे सांगते. आज आमदार सरनाईक यांनी पत्र दिले आहे, उद्या सगळेच आमदार पत्र देऊ शकतात मग काय होईल?. कारण ही सगळ्यांच्याच मनातील भावना आहे. 
...    

हेही वाचा...

नाशिकमधील गिरीश महाजनपर्व अस्ताकडे...

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख