शिवसेना आमदार सुहास कांदेंनी दिला चक्क आत्मदहनाचा इशारा  - Shivsena MLA Suhas kande caveat Self-immolation, Nashik Politics | Politics Marathi News - Sarkarnama

शिवसेना आमदार सुहास कांदेंनी दिला चक्क आत्मदहनाचा इशारा 

संपत देवगिरे
मंगळवार, 29 जून 2021

आमदार म्हणजे तालुक्याच्या प्रशासनावर वचक ठेवणारा लोकप्रतिनिधी असतो. मात्र अनेकदा प्रशासन आणदारांनाही दाद देत नाही, तेव्हा काय करायचे असा प्रश्न पडतो. नांदगावला हा प्रश्न नागरिकांना नव्हे तर चक्क आमदारांनाच पडलाय. तो देखील दरारा असलेल्या आमदारांना.

नांदगाव : आमदार म्हणजे तालुक्याच्या प्रशासनावर वचक ठेवणारा लोकप्रतिनिधी असतो. मात्र अनेकदा प्रशासन आमदारांनाही दाद देत नाही, (Administration doesn`t take cognizance MLA Deemands)  तेव्हा काय करायचे असा प्रश्न पडतो. नांदगावला हा प्रश्न नागरिकांना नव्हे तर चक्क आमदारांनाच पडलाय. (In Nandgaon people & MLA in confusion) तो देखील दरारा असलेल्या सुहास कांदे (Suhas Kande) यांना. त्यामुळे त्यांनी शिवसेना स्टाईल आंदोलन वगैरेचा विचार न करता थेट आत्मदहनाचाच इशारा दिला आहे. त्यामुळे त्यांचा हा इशारा प्रशासन व नागरिक सगळ्यांमध्ये चर्चेचा विषय ठरला आहे.  

मतदारसंघातील भूमिअभिलेख कार्यालयात नागरिकांच्या होत असलेल्या अडवणुकीच्या पार्श्‍वभूमीवर आमदार सुहास कांदे यांनी कार्यालयास भेट देत अधिकाऱ्यांची झाडाझडती घेत कार्यालयासमोर मंगळवारी सकाळी दहाला कार्यकर्त्यांसह आत्मदहन करण्याचा इशारा दिला. आमदार कांदे यांनी इशारा देताच प्रशासकीय यंत्रणेची रात्री उशिरापर्यंत धावपळ सुरू होती. 

येथील भूमिअभिलेख कार्यालयात मोठ्या प्रमाणात अनागोंदी कारभार केला जात असून, नागरिकांना प्रॉपर्टी कार्ड न देणे, जमिनीच्या मोजणीसाठी पैसे मागणे, सहा-सहा महिने प्रकरणे प्रलंबित ठेवली जात आहे. तसेच मोजणी प्रकरणे व खरेदी झालेल्या मालमतांची नावे लावणे अशी कामे होणे अपेक्षित असताना ही कामे रेंगाळली आहेत. याबाबत अधिकाऱ्यांकडे जाब विचारला असता, कोरोनामुळे कर्मचारी उपस्थिती कमी आहे. पदे रिक्त असल्याने कामाचा लोड आहे, अशी कारणे दिली जातात.

भूमिअभिलेख कार्यालयात नागरिकांच्या अडचणींचा डोंगर नागरिकांनी आमदार कांदे यांच्यासमोर मांडताच तक्रारींची दखल घेत श्री. कांदे यांनी भूमिअभिलेख कार्यालय गाठले. या वेळी विभागात केवळ चार कर्मचारी उपस्थित होते. त्यांनी अधिकाऱ्यांस संपर्क साधला असता, त्यांनी कोरोनाच्या अनुपस्थितीचा नियम सांगत बोलण्यास टाळाटाळ केली.

यानंतर अखेर संतप्त झालेल्या आमदार कांदे यांनी जिल्हा पोलिस अधीक्षक सचिन पाटील यांना पत्र देत भूमिअभिलेख कार्यालयांतर्गत जमिनीचे उतार काढणे, जमिनीची मोजणी करणे, खरेदीच्या नोंदी टाकणे, चातुःसीमा तयार करणे, तसेच जमिनीबाबतच्या विविध प्रकारच्या नोंदी करण्यासाठी सामान्य जनता, शेतकरी वर्षानुवर्षे चकरा मारूनही जनतेची कामे प्रलंबित आहे. कार्यालयातील कर्मचाऱ्यांना वारंवार सूचना देऊनही कार्यालयात १७ कर्मचारी नियुक्त असताना काम करण्यासाठी खासगी एजंट कामे करता म्हणून आपण आज आत्मदहन करणार असल्याचा इशारा दिला. 

यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख किरण देवरे, शिवसेना शहरप्रमुख सुनील जाधव, युवासेना तालुकाप्रमुख सागर हिरे, युवसेना शहरप्रमुख मुज्ज्मील शेख आम्ही सर्व आत्मदहन करणार असल्याचेही त्यांनी पत्रात नमूद करत आमच्या जीवितास धोका निर्माण झाल्यास होणाऱ्या परिणामांची सर्वस्वी जबाबदारी जिल्हा अधीक्षक महेश शिंदे, उपअधीक्षक विलास दानी यांची असेल, असेही सांगितले. 
...

हेही वाचा...

काॅंग्रेसला गुड न्यूज...नगरसेवक सय्यद मुशीर यांनी केला काॅंग्रेस प्रवेश
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख