संजय राऊत यांना कावीळ झाली आहे! - Shivsena leader Sanjay Raut suffering from Jaundice, Nashik Politics | Politics Marathi News - Sarkarnama

संजय राऊत यांना कावीळ झाली आहे!

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 28 जून 2021

शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांच्याकडून सातत्याने बेभान वक्तव्य करण्यात येतात. त्यांना फारसं गांभीर्याने घेण्याची गरज नाही. `ईडी` आणि `सीबीआय` या विश्वासार्ह संस्थाच आहेत. कोणत्याही सरकारकडून त्याबाबत नियमानेच कारवाई होते.

मुंबई : शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांच्याकडून सातत्याने बेभान वक्तव्य करण्यात येतात. (Sanjay Raut continuesly doing absurd Statement) त्यांना फारसं गांभीर्याने घेण्याची गरज नाही. `ईडी` आणि `सीबीआय` या विश्वासार्ह संस्थाच आहेत. (ED & CBI are credible agencies) कोणत्याही सरकारकडून त्याबाबत नियमानेच कारवाई होते. राऊत यांचे आरोप विचारात घेतले तर काँग्रेसच्या कार्यकाळात झालेली कारवाई राजकीय होती, असे मानायचे काय?, असा प्रश्न भाजप नेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांनी म्हटले आहे.  

शिवसेना नेते संजय राऊत यांनी केंद्र सरकार केंद्रीय यंत्रणांचा राजकीय हेतूने वापर करीत असल्याची टिका केली होती. यासंदर्भात दरेकर यांनी त्यांना उत्तर दिले. ते म्हणाले, राऊत यांच्या टीकेला काडीची किंमत नाही. त्यांचे वक्तव्य आणि टीका संदर्भहीन असतात. ईडी आणि सीबीआय  देशातील विश्वासार्ह आणि स्वायत्त संस्था आहेत. देशात कोणाचेही सरकार असो, या संस्थांचा चुकीचा वापर करत नाहीत. राऊत यांच्या टिकेला गांभिर्याने घेतले तर, अस म्हणायचं का की, काँग्रेस सरकारच्या कारकिर्दीत ज्या ज्या चौकशा झाल्या, त्यात राजकीय हात नव्हता?.

ते पुढे म्हणाले, समाजवादी पक्ष व बहुजन समाज पक्षाच्या प्रकरणात त्यावेळी चौकशीचा दबाव टाकून सत्ता कशी राखली गेली हे देशाला माहित आहे. आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं बघायचं वाकून ही सवय श्री. राऊत यांना आहे.

श्री. दरेकर यांनी, राज्यात जे सत्ताधारी आहेत, ते गाव स्तरावरील अनेक कार्यकर्त्यांना कारण नसताना त्रास देतात. मात्र तुम्ही सूड भावनेने अशा गोष्टी करतात असे मी कधीच म्हटलं नाही. असे सांगितले. ते म्हणाले, आरोप किंवा तक्रार दाखल झाली तर कुठलीही एजन्सी तपास करते. तपासाला सामोरं जाताना अडचणीत येऊ अशी त्यांची खात्री झाली आहे. त्यामुळे त्याला राजकीय रंग देण्याचा केविलवाणा आणि दुर्दैवी प्रयत्न आहे.

दरेकर यांनी केंद्र सरकारचे समर्थन केले. संघराज्य पद्धतीची भलामण करताना, केंद्राशी संघर्षाचे वातावरण निर्माण करण्यात आणि संघराज्य सूचीबद्दल बोलणे हे हास्यास्पद आहे, असे सांगतिले. ते म्हणाले, विरोधकांनी जाणीव ठेवावी की, आरोग्य, कायदा सुव्यवस्था हा विषय संघराज्य सूचिमध्ये आहे. दोन्ही गोष्टीत आपल्याला अपयश आले. त्यावेळेस संघराज्य चुकीचं असे सूतोवाच आपण करत नाही. त्यामुळे राऊत यांना अशा प्रकारे बोलण्याचा नैतिक अधिकार नाही.

फडणवीसांचा अभ्यास दांडगा
ते म्हणाले, संजय राऊत अभ्यास करत नाहीत. माहिती घेत नाहीत. `ओबीसी` आरक्षण रद्द केलं त्यावेळेस फडणवीसांनी राजकीय आरक्षणाचा अध्यादेश काढून कायद्यात रूपांतर करून दिलं. फडणवीस यांचा मराठा आरक्षणासंदर्भात मोठा अभ्यास आहे. त्यामुळेच ते कोर्टामध्ये टिकलं. ओबीसी घटकांचे राजकीय आरक्षण देखील ते टिकवतील. त्यांचा कॉन्फिडन्स मोठा आहे, पण यांना पोटशूळ होतोय त्यामुळे त्यांनी केलेली व्यक्तव्य म्हणजे असली गरळ आहे.
...

हेही वाचा...

जि. प. सदस्या सिमंतिनी कोकाटे करणार नोंदणी विवाह

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख