राऊत साहेब, शिवसेना हा देवळालीचा भूतकाळ! - Shivsena is Devlali`s past, But NCP Is Future. Nashik Politics | Politics Marathi News - Sarkarnama

राऊत साहेब, शिवसेना हा देवळालीचा भूतकाळ!

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 8 फेब्रुवारी 2021

राजकारणात काहीही स्थीर नसते. जो जनतेचे प्रश्न सोडवतो. ज्याला जनतेची नाळ कळली तोच जनतेचा पसंतीला उतरतो. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचा पराभव करुन राष्ट्रवादी काँग्रेसचा आमदार झाला आहे. हे वास्तव अनेकांना अद्यापही पचलेले नाही.

नाशिक : राजकारणात काहीही स्थीर नसते. जो जनतेचे प्रश्न सोडवतो, ज्याला जनतेची नाळ कळली तोच जनतेचा पसंतीला उतरतो. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचा पराभव करुन राष्ट्रवादी काँग्रेसचा आमदार झाला आहे. हे वास्तव अनेकांना अद्यापही पचलेले नाही. त्यामुळे शिवसेना हा देवळालीचा भूतकाळ झाला आहे. जनतेच्या प्रश्नांसाठी सक्रीय असलेला राष्ट्रवादी काँग्रेस हेच देवळालीचे वर्तमान आहे, असे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे नाशिक तालुका अध्यक्ष गणेश गायधनी यांनी म्हटले आहे.

शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी नुकताच नाशिकचा दौरा केला. यावेळी त्यांनी देवळाली मतदारसंघात झालेल्या कार्यक्रमात देवळाली मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. भविष्यातही शिवसेनेचाच बालेकिल्ला राहील असे वक्तव्य केले होते. गतवर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या शिवसेनेचा पराभव झाला होता. येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरोज अहिरे यांनी शिवसेनेच्या योगेश घोलप यांचा पारभव केला होता. या पार्श्वभूमीवर खासदार राऊत यांनी हे वक्तव्य केले होते. ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक नेते, कार्यकर्त्यांना चांगलेच झोंबले. त्यामुळे श्री. गायधनी यांनी श्री. राऊत यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला.  

श्री. गायधनी म्हणाले, जरी देवळाली विधानसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जात होता, तरी तो भूतकाळ होता, आता अनेक समीकरणे बदलून हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला झाला आहे. यापुढेही राहणार आहे. विद्यमान आमदार सरोजताई आहिरे आतापर्यंत सर्वांत जास्त मताधिक्याने निवडून आल्या आहेत. हे विसरून चालणार नाही. त्यांनी चालवलेला कामांचा धडाका ही महत्त्वाची बाब आहे. पळसे गावात येऊन कोण काय बोलतंय  याकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष लक्ष देत नाही, सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकारी जनतेच्या कामांवर आणि जनतेसाठी काम करणे हेच उद्दिष्ट ठेऊन सक्रीय आहेत. पुढील महाविकास आघाडीची समीकरणे आणि एकत्रित लढण्याची भूमिका लक्षात घेता विजयी जागा त्याच पक्षाला सोडणार असल्यामुळे येथे राष्ट्रवादीच उमेदवार देणार हे निश्चित आहे.
...
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख