शिवसेना म्हणते, राजकीय गुन्हे मागे घ्यावेत

राजकीय किंवा सामाजिक स्वरूपाचे, किरकोळ स्वरूपाचे गुन्हे असलेल्या व्यक्तींची गुन्हेगारी पार्श्वभूमी तपासून त्यांच्यावरील ते गुन्हे मागे घ्यावेत, अशी मागणी शिवसेनेच्या शिष्टमंडळाने पोलिस आयुक्त दीपक पांडे यांच्याकडे केली. आयुक्तांनी सकारात्मक विचार करून निर्णय घेणार असल्याचे सांगितल्याची माहिती शिवसेना महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी दिली.
Sudhakar Badgujar
Sudhakar Badgujar

नाशिक : राजकीय किंवा सामाजिक स्वरूपाचे, किरकोळ स्वरूपाचे गुन्हे असलेल्या व्यक्तींची गुन्हेगारी पार्श्वभूमी (political cases shall be withdraw) तपासून त्यांच्यावरील ते गुन्हे मागे घ्यावेत, (Police commissioner should take decision) अशी मागणी शिवसेनेच्या शिष्टमंडळाने पोलिस आयुक्त दीपक पांडे यांच्याकडे केली. आयुक्तांनी सकारात्मक विचार करून निर्णय घेणार असल्याचे सांगितल्याची माहिती शिवसेना महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर (Sudhakar Badgujar) यांनी दिली. 

शिवसेना शिष्टमंडळाने मंगळवारी पोलिस आयुक्त दीपक पांडे यांची भेट घेतली. सामाजिक व राजकीय स्वरूपाचे किरकोळ गुन्हे दाखल असलेल्या नागरिकांना पोलिसांतर्फे सातत्याने नोटिसा बजावल्या जात असल्याने मनस्ताप सहन करावा लागतो.

कोरोनाकाळात हाताला काम नसल्याने सदर कुटुंबावरील पहिलेच मानसिक दडपण असल्याचे शिवसेना उपनेते माजी मंत्री बबन घोलप, श्री. बडगुजर यांनी निदर्शनास आणून दिले. चर्चेअंती गुन्हेगारी पार्श्वभूमी नसलेल्या ज्या लोकांना नोटिसा काढल्या त्यांना सुधारण्याची एक संधी देण्यासाठी अशा लोकांचे विभागनिहाय मेळावे आयोजित करून त्या भागातील नागरिकांची मते जाणून घेण्यात येतील.

नागरिकांकडून चांगला अभिप्राय आल्यास अशा लोकांना सुधारण्याची एक संधी निश्चितच दिली जाईल, असे आश्वासन आयुक्त पांडे यांनी दिल्याचे श्री. बडगुजर यांनी सांगितले. शिष्टमंडळात विरोधी पक्षनेता अजय बोरस्ते, माजी जिल्हाप्रमुख सुनील बागूल, दत्ता गायकवाड, माजी आमदार वसंत गिते, माजी महापौर विनायक पांडे, माजी शिक्षण मंडळ उपसभापती राजेंद्र देसाई, युवासेना जिल्हा चिटणीस गणेश बर्वे आदींचा समावेश होता. 
...
हेही वाचा...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com