भाजपच्या स्थायी सदस्य नियुक्तीला शिवसेनेचा आक्षेप

महापालिकेच्या तिजोरीच्या चाव्या असलेल्या स्थायी समितीच्या नियुक्त्यांना चोविस तास होण्याआधीच त्यावरुन धुसफूस सुरु झाली आहे. या नियुक्त्या करताना महापौरांनी नियमांचे पालन केले नाही. त्यामुळे या नियुक्त्या कायदेशीर नाहीत. त्याबाबत फेरविचार करावा अशी मागणी शिवसेनेचे महानगरप्रमुख, नगरसेवक सुधाकर बडगुजर यांनी केली आहे.
Sudhakar Badgujar
Sudhakar Badgujar

नाशिक : महापालिकेच्या तिजोरीच्या चाव्या असलेल्या स्थायी समितीच्या नियुक्त्यांना चोविस तास होण्याआधीच त्यावरुन धुसफूस सुरु झाली आहे. या नियुक्त्या करताना महापौरांनी नियमांचे पालन केले नाही. त्यामुळे या नियुक्त्या कायदेशीर नाहीत. त्याबाबत फेरविचार करावा अशी मागणी शिवसेनेचे महानगरप्रमुख, नगरसेवक सुधाकर बडगुजर यांनी केली आहे. 

स्थायी समितीवरील भाजपच्या आठ सदस्यांची नावे जाहीर करताना विद्यमान चार सदस्यांचे राजीनामे नसतानाही त्यांच्या जागेवर नवीन सदस्यांची नियुक्ती केल्याने महापौर सतीश कुलकर्णी यांनी बेकायदेशीर नावे जाहीर केली आहेत. आयुक्तांनी या बेकायदेशीर ठरावाची अंमलबजावणी न करता शासनाकडे विखंडनासाठी पाठवावा, अशी मागणी नगरसेवक व स्थायी समितीचे सभापती सुधाकर बडगुजर यांनी केली. दरम्यान, नगरसचिव विभागानेही बडगुजर यांच्या पत्राला उत्तर देताना समिती सदस्यांचे राजीनामे प्राप्त न झाल्याची कबुली दिल्याने पुन्हा एकदा कायदेशीर वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. 

उच्च न्यायालयाने तौलनिक संख्याबळानुसार स्थायी समितीमध्ये भाजपचा एक सदस्य कमी करून शिवसेनेचा एक अतिरिक्त सदस्याची नियुक्ती करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार शिवसेनेच्या अतिरिक्त एका सदस्याची नियुक्त जाहीर केल्यानंतर उर्वरित दोन व भाजपच्या चार सदस्यांची नियुक्ती घोषित करणे अपेक्षित होते. परंतु महापौरांनी भाजपच्या नवीन आठ सदस्यांची नियुक्ती जाहीर केली. त्यावरून आता नवा वाद निर्माण झाला आहे. दोन वर्ष पूर्ण न झालेल्या भाजपच्या डॉ. वर्षा भालेराव, सुप्रिया खोडे, हेमंत शेट्टी, राकेश दोंदे यांचे राजीनामे नसताना त्यांच्या जागेवर नवीन चार सदस्यांची नियुक्ती केल्याने शिवसेनेचे सुधाकर बडगुजर यांनी आक्षेप घेत बेकायदेशीर नियुक्तीचा ठराव असल्याचा आरोप केला. आयुक्तांनी ठरावाची अंमलबजावणी न करता शासनाकडे विखंडनासाठी पाठविण्याची मागणी त्यांनी केली. 
...

भारतीय जनता पक्षाने पूर्वीचे अनुभव लक्षात घेऊन नियमानुसार कामकाज केले पाहिजे. कायदेशीर कामकाज केले नाही तर, राज्य शासनाकडे दाद मागावी लागेल. - सुधाकर बडगुजर, महानगरप्रमुख, शिवसेना.
...
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com