शिवसेनेने महासभेत `दत्तक बाप` काढताच भाजपचा संताप !

महापालिकेची व्हर्च्युअल महासभा आज झाली. मात्र ही व्हर्च्युअल सभा प्रत्यक्ष धक्काबुक्की, आरोप प्रत्यारोप व राजदंड पळविण्यापर्यंत मजल गेली. यावेळी पाणी प्रश्नावर शिवसेनेने महासभेत `दत्तक बापाने दिले काय?` या घोषणा दिल्याने शिवसेना आणि भाजपच्या सदस्यांत अक्षरशः तुंबळ वादावादी झाली.
Shivsena NMC
Shivsena NMC

नाशिक : महापालिकेची व्हर्च्युअल महासभा आज झाली. मात्र ही व्हर्च्युअल सभा प्रत्यक्ष धक्काबुक्की, आरोप प्रत्यारोप व राजदंड पळविण्यापर्यंत मजल गेली. यावेळी पाणी प्रश्नावर शिवसेनेने महासभेत `दत्तक बापाने दिले काय?` या घोषणा दिल्याने शिवसेना आणि भाजपच्या सदस्यांत अक्षरशः तुंबळ वादावादी झाली. त्यामुळे ही महासभा चांगलीच गाजली.     

गेल्या अनेक दिवसांपासून नाशिकरोड भागात दुर्गंधीयुक्त दुषित पाणी पुरवठा होतो. त्यामुळे महासभेत जोरदार राडा झाला. शिवसेनेच्या नगरसेवकांनी महापौरांच्या दालनात धाव घेत प्रशासन व सत्ताधारी भाजप विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. `दत्तक बापाने दिले काय?` हा सवाल भाजपच्या जिव्हारी लागल्याने भाजपकडूनही जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले. त्यातून वाद विकोपाला जावून राजदंड पळविण्याचा प्रयत्न झाला. राड्यामुळे महासभा काही काळासाठी तहकुब करण्यात आली.

ऑनलाईन महासभेचे कामकाज सुरु झाल्यानंतर शिवसेनेच्या नगरसेवकांनी विरोधी पक्षनेत्यांच्या कार्यालयातून महापौर सतीश कुलकर्णी यांच्याकडे पाण्याचा प्रश्‍न मांडला. प्रश्‍न सोडविण्याचे आश्‍वासन देताना विषय पत्रिका वाचनाच्या सुचना महापौरांनी दिल्या.  त्यामुळे नाराज विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते, शिवसनेचे गटनेते विलास शिंदे, सत्यभामा गाडेकर, जयश्री खर्जुल, सुनिता कोठुळे आदींनी थेट महापौरांच्या दालनात दाव घेत जाब विचारला. प्रशासनाविरोधात घोषणाबाजी होत असताना दत्तक पित्याने नाशिकला दिले काय असा सवाल महापौरांसमोरचं ठिय्या दिलेल्या प्रशांत दिवे, चंद्रकांत लवटे व रमेश धोंगडे यांनी केला. 

त्यामुळे संतप्त झालेल्या महापौर कुलकर्णी यांच्यासह सभागृह नेते सतीश सोनवणे, गटनेते जगदीश पाटील, नगरसेवक मुकेश शहाणे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. घोषणांच्या शह-प्रतिशह देण्याच्या स्पर्धेतून गोंधळ वाढला. गोंधळातचं महापौरांसमोरील राजदंड पळविण्याचा प्रयत्न दिवे, लवटे व धोंगडे यांनी केला. परंतू भाजप सभागृह नेते सोनवणे, पाटील व शहाणे यांच्याकडून प्रयत्न हाणून पाडला. महापौरांनी सभागृह सोडल्यानंतर बाजुला ठेवण्यात आलेला राजदंड शिवसेनेकडून पळविण्याचा प्रयत्नातून भाजप व शिवसेना नगरसेवकांची झटापट झाली. यात शाब्दीक वाद विकोपाला गेला. भाजप गटनेते पाटील यांनी केवळ प्रसिध्दीसाठी ही स्टंटबाजी असल्याची टीका केल्यानंतर शिवसेनेचे नगरसेवक त्यांच्यावर धाऊन गेले.

उपअभियंत्याची उचबांगडी
नाशिकरोडच्या पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता अविनाश भोये यांना दुषित पाणीपुरवठ्यास जबाबदार धरत त्यांच्याकडील पाणीपुरवठ्याचा पदभार काढून शाखा अभियंता सुनील दप्तरे यांच्याकडे सोपविण्याचे आदेश महापौर कुलकर्णी यांनी प्रशासनास दिले. नाशिकरोड विभागातील पाणीप्रश्न कायमचा सोडविण्यासाठी बुधवारी(दि.२०) सायंकाळी ५.३० वाजता नाशिकरोड विभागातील नगरसेवक व पाणीपुरवठा विभागातील अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक महापौर निवासस्थान 'रामायण' येथे घेण्यात येणार असल्याचेही महापौरांनी जाहीर केले.

महासभेचे कामकाज पुन्हा सुरू झाले. तेव्हा कार्यकारी अभियंता (पाणीपुरवठा) शिवाजी चव्हाणके यांनी नाशिकरोड विभागासाठी गंगापूर धरणातून पाणीपुरवठा होणार आहे. त्यासाठी स्वतंत्र जलवाहिनी टाकण्याकरीता १८.९१ कोटी खर्चाच्या निविदा मागविल्या आहेत. सद्यस्थितीत या विभागात ३ ते ४ एमएलडी पाणीपुरवठा कमी होत आहे. त्यामुळे ट्रायल बेसवर दारणातून एक दिवस पाणी उचलण्यात आले होते. परंतू ते दुषित आढळल्याने पाणीउचलणे बंद करण्यात आले आहे. 
...
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com