पालकमंत्री भुजबळांच्या मतदारसंघात शिवसेनाही विकासासाठी सक्रीय ! - Shivsena also active in Yeola for Devolopment | Politics Marathi News - Sarkarnama

पालकमंत्री भुजबळांच्या मतदारसंघात शिवसेनाही विकासासाठी सक्रीय !

सरकारनामा ब्युरो
रविवार, 1 नोव्हेंबर 2020

विकास हवा तर त्यासाठी निधी हवा. त्यामुळे सदस्यांना गावाच्या विकासासाठी जास्तीत जास्त निधी कास मिळेल याचा सातत्याने पाठपुरावा केला पाहिजे, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब क्षिरसागर यांनी केले. 

येवला  : ग्रामविकासाला चालना देण्यासाठी विविध यंत्रणा काम करतात. त्याची माहिती प्रत्येक लोकप्रतिनिधीने घ्यावी. विकास हवा तर त्यासाठी निधी हवा. त्यामुळे सदस्यांना गावाच्या विकासासाठी जास्तीत जास्त निधी कास मिळेल याचा सातत्याने पाठपुरावा केला पाहिजे, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब क्षिरसागर यांनी केले. 

एरंडगाव (येवला) येथील ग्रामपंचायत कार्यालयात शिवसेनेचे लोकप्रतिनिधी, पंचायत समिती व जिल्हा परिषदेच्या पदाधिका-यांची बैछक झाली.  ग्रामविकासातील कामकाजात येणाऱ्या समस्या जाणुन घेण्यासाठी ही बैठक झाली. यावेळी ,्थानिक पातळीवर येणा-या समस्यांचे निराकरण करण्यासाठी जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब क्षिरसागर, शिवसेना नेते संभाजी पवार यांच्या उपस्थितीत आढावा घेण्यात आला. 

श्री. क्षिरसागर म्हणाले,  राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आहे. नाशिकला जिल्हा परिषदेत हे सर्व पक्ष एकत्र आहेत. त्यामुळे सर्व नेते, सदस्य विकासाच्या प्रश्नावर एकोप्याने काम करीत आहेत. कोरोनामुळे राज्य व  जिल्हा स्तरावर अनेक अडचणी आहेत. विशेषतः आर्थिक अडचणी अधिक आहेत. मात्र तरीही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील विकासाच्या योजनांवर त्याचा परिणाम होणार नाही, यासाठी प्रयत्नशील आहेत. त्यांच्या नियोजनामुळेच आपण कोरोनाच्या संकटावर मात करु शकलो. त्यात सर्वांनी सहभाग द्यावा. 

ग्रामपंचायतीस निधी कमी पडत असेल तर थेट माझ्याशी संपर्क साधावा असे आवाहन केले आहे. पुढील आढावा बैठक राज्यमंत्री यांचे उपस्थितीत आपण घेणार असल्याचेही यावेळी श्री. क्षिरसागर म्हणाले.

ग्रामपंचायतींना येणाऱ्या विविध प्रकारच्या निधीतून गावची विकासकामे करतांना निर्माण होणाऱ्या अडचणी, समस्यांची उकल यावर बैठकीत चर्चा झाली. गावासाठी निधी मिळवून देण्यासाठी आपण लक्ष द्यावे, असे श्री. क्षिरसागर यांना लोकप्रतिनिधीनी साकडे घातले. 

यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख सुनील पाटील, शिक्षण व आरोग्य सभापती सुरेखाताई दराडे, पंचायत समिती सभापती प्रवीण गायकवाड, उपसभापती मंगेश जाधव, समाज कल्याण सभापती सुशीला मेंगाळ, युवा नेते कुणाल दराडे, शिवसेना नेते भास्कर कोंढरे, गणेश पेंढारे, विठ्ठलराव आठशेरे, विकास सोसायटी चेअरमन कचरू उराडे, काकासाहेब पडोळ, विकास गायकवाड, चंद्रकांत उराडे उपस्थित होते.
..  
 

https://scontent.fdel1-3.fna.fbcdn.net/v/t39.2365-6/12726927_46073809745...

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख