सिन्नरमध्ये पारनेरची पुनरावृत्ती; शिवसेनेचे 5 नगरसेवक फुटले  - Shivsena 5 corporator rebels...repeataion of Parner in Sinner | Politics Marathi News - Sarkarnama

सिन्नरमध्ये पारनेरची पुनरावृत्ती; शिवसेनेचे 5 नगरसेवक फुटले 

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 30 जुलै 2020

नगर परिषद उपनगराध्यक्षपदाच्या निवडणूकीत शिवसेनेच्या पाच नगरसेवकांनी बंडखोरी केली. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार माणिकराव कोकाटे यांच्या पुढाकाराने ही बंडखोरी झाली. त्यामुळे पारनेरची पुनरावृत्ती झाल्याने शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी कॉंग्रेस असा वाद उफाळून आला आहे.

सिन्नर : नगर परिषद उपनगराध्यक्षपदाच्या निवडणूकीत शिवसेनेच्या पाच नगरसेवकांनी बंडखोरी केली. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार माणिकराव कोकाटे यांच्या पुढाकाराने ही बंडखोरी झाली. त्यामुळे पारनेरची पुनरावृत्ती झाल्याने शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी कॉंग्रेस असा वाद उफाळून आला आहे. यानंतर प्रचंड तणाव निर्माण झाल्याने फुटलेले नगरसेवक भुमिगत झाले. या धामधुमीत बंडखोरांतील बाळासाहेब उगले हे उपनगराध्यक्ष झाले. 

शिवसेनेचे माजी आमदार राजाभाऊ वाजे यांच्या पुर्वनियोजीत सोशल इंजिनिअरींगचा भाग म्हणून निश्‍चित केलेल्या उमेदवाराच्या नावाला विरोध म्हणून सिवसेनेतील श्री. कोकाटे यांच्या संपर्कातील नगरसेवकांच्या पुढाकाराने हे बंड घडले. नगरसेविका सुजाता तेलंग, गीता वरंदळ, निरूपमा शिंदे, विजया बर्डे व बाळासाहेब उगले हे सर्व बंडखोर आमदार कोकाटे गटात सामील झाले. गंमत म्हणजे, उपनगराध्यक्ष पद हे केवळ सोळा महिन्यांसाठीच आहे. श्री. कोकाटे यापूर्वी भाजपमध्ये होते. त्यामुळे कोकाटे गटाचे नऊ नगरसेवक हे भाजपच्या चिन्हावर विजयी झालेले आहेत. स्थानिक राजकारणात शिवसेनेचे बंडखोर राष्ट्रवादीच्या कोकाटे गटात, मात्र त्यांचा पाठींबा भाजपला असा गोंधळ आहे. त्यामुळे राजकारण चांगलेच तापले. आज  शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय कंरजकर व माजी आमदार राजाभाऊ वाजे यांच्या उपस्थितीत बैठक होणार आहे. त्यात पुढील भूमिका ठरेल. मात्र यामध्ये हे प्रकरण वरिष्ठ पातळीवर जाणार असल्याने नगरसेनवकांवर त्याचे दडपण आहे. 

शिवसेनेचे उपनगराध्यक्ष गोविंदराव लोखंडे यांनी रोटेशननुसार राजीनामा दिला होता. त्यानंतर प्रत्येकाला संधी मिळण्यासाठी उपनगराध्यक्षपदासाठी प्रणाली गोळेसर यांचे नाव निश्‍चित झाले होते. मात्र शिवसेनेच्या वाजे गटातील पाच नगरसेवकांनी बंडखोरी केलेल्या बाळासाहेब उगले यांना मतदान करीत सत्ताधारी गटाला धक्का दिला. नगर परिषदेच्या सभागृहात तहसीलदार तथा पीठासीन अधिकारी राहुल कोताडे यांच्या उपस्थितीत ही निवडणूक झाली. नगरसेवकांनी ऑनलाइन, एका सदस्याने तोंडी तर दोन सदस्यांनी कनेक्‍ट न झाल्याने प्रत्यक्षात हजर होऊन मत नोंदविले. या वेळी वाजे गटाच्या अपक्ष नगरसेविका प्रणाली गोळेसर यांना 29 पैकी 14, तर कोकाटे गटात गेलेले बंडखोर उमेदवार बाळासाहेब उगले यांना 15 मते मिळाली. ते उपनगराध्यक्षपदी विजयी झाले. 
... 
गेल्या दोन-तीन वर्षांत नगर परिषदेत बेदिली सुरू आहे. नगरसेवकांची कामे न केल्यानेच  हा उद्रेक झाला आहे. आणखी बरेचसे कार्यकर्ते सध्याच्या कारभारावर नाराज आहेत. नगर परिषदेत चाललेल्या बोगस कारभाराला यापुढे थारा देणार नाही.

- आमदार माणिकराव कोकाटे. 
... 
प्रत्येकाची अपेक्षापूर्ती तर करू शकत नाही. दोन वंजारी, एक मराठा यांना संधी दिली. या वेळी जिरेमाळी समाजाला संधी देण्याचे ठरविले होते. सोशल इंजिनिअरिंगचा प्रयत्न होता. सर्वांना संधी देण्याच्या प्रयत्नात नाराजी ही राहणारच.

-राजाभाऊ वाजे, माजी आमदार. 
... 
 

https://scontent-sin6-2.xx.fbcdn.net/v/t39.2365-6/12726927_4607380974576...

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख