नाशिकच्या चुंभळे यांना `इडी`च्या नावे धमकी?

कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती शिवाजी चुंभळे यांना `इडी`च्या नावाने भ्रमणध्वनीवरून धमकी आली आहे. याबाबत राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे.
Shivaji Chumbhle
Shivaji Chumbhle

नाशिक : कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती शिवाजी चुंभळे (APMC Ex Chairmen Shivaji Chumbhale) यांना `इडी`च्या नावाने भ्रमणध्वनीवरून धमकी आली आहे. (Got Threatning call with ED`s name) याबाबत राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे.

गेल्या काही वर्षांपासून राज्यातील विविध नेत्यांकडे `इडी`चे धाडसत्र सुरू आहे. यामध्ये विविध नेत्यांना नोटीस बजावणे तसेच त्यांच्यावर कारवाई करणे आदी प्रकार सुरू आहेत.

आता नाशिकमधील राजकीय वर्तुळातील मोठं नाव म्हणून ओळख असलेले कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती शिवाजी चुंभळे यांना मंगळवारी एका भ्रमणध्वनीवरून मी `इडी` कार्यालयातून बोलतो आहे. आपल्या संदर्भात तक्रार आलेली आहे. अशा प्रकारची चौकशी करून धमकी देण्यात आली की, ताबडतोब आम्हाला भेट अन्यथा कारवाईला सामोरे जावे लागेल, असे सांगण्यात आले. त्याची माहिती श्री. चुंभळे यांनीत दिली. त्यामुळे राजकीय वर्तुळात तो चर्चेचा विषय ठरला आहे. 

यावेळी दूरध्वनीवरून बोलणाऱ्याने राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांचे देखील नाव घेण्यात आले. यासंदर्भात चुंभळे कुटुंबिय लवकरच पोलिस ठाण्यात तक्रार देण्याच्या तयारीत आहे. याबाबतची सत्य, सत्यता अद्याप समोर आलेली नाही. मात्र असे असले तरी याची शहानिशा होणे आवश्यक असल्याचे बोलले जात आहे.

दिलीप थेटे यांनाही दूरध्वनी
दरम्यान यापूर्वी नाशिक बाजार समितीचे उपसभापती दिलीप थेटे यांना देखील अशा प्रकारची धमकी आली होती. त्याबाबत त्यांनी पोलिसांत तक्रार केली होती. त्याच्या तपासातून काहीच निष्पन्न झाले नव्हते. त्यामुळे इडीच्या नावाने येणाऱ्या धमक्यांत किती तत्थ्य आहे, याबाबत तपास यंत्रणांच सांगू शकतील. 
...
हेही वाचा...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com