शिवसेनेच्या महापौरांनी घेतला हातात झाडू  ; भाजपला प्रत्युत्तर 

भारतीय जनता पक्ष केवळ आरडाओरड करतो
Sarkarnama (90).jpg
Sarkarnama (90).jpg

जळगाव : शहरात साफसफाई होत नसल्याने रोगराई पसरत असल्याचा आरोप करीत भाजपने आंदोलन केले, त्याला शिवसेनेच्या महापौर जयश्री महाजन यांनी हातात झाडू घेऊन रस्ता साफ करून कृतीने उत्तर दिले.

काल गणेश चतुर्थीला मोठ्या उत्साहात गणरायाच्या आगमन झालं. महानगरपालिकेतर्फे शहरातील अनेक ठिकाणी गणपती बाप्पाच्या पूजेचे साहित्य तसेच मुर्त्या विक्रीसाठी जागा उपलब्ध करून दिली होती. आज सकाळी महापौर जयश्री महाजन यांनी याठिकाणी स्वतः हातात झाडू घेऊन साफसफाई सुरू केली. ज्या ज्या ठिकाणी गणपती मूर्त्यांचे स्टॉल होते. त्या ठिकाणी महापौर आणि त्यांच्या टीमने स्वच्छता केली. एक नवीन संदेश नागरिकांना दिला आहे. 
 
राणेंचा यु-टर्न, म्हणाले, 'तर आम्ही मुख्यमंत्री ठाकरेंचं स्वागत करू'

पूजा, फुल विक्रेते यांनी केळीचे पान, पूजा साहित्य, फुले त्याचा ठिकाणी सोडून निघून जातात. या सर्व नाशवंत वस्तू असून त्यांच्या पासून शहरात घाण वास आणि रोगराई पसरू शकते म्हणून महापौर जयश्री महाजन यांनी स्वतः हुन हातात झाडू घेऊन स्वच्छता केली आहे. सकाळी 6 वाजता त्यांनी स्वच्छतेला सुरवात केल्याने हा सर्वत्र चर्चेचा विषय ठरला आहे.  भारतीय जनता पक्ष केवळ आरडाओरड करते शिवसेना मात्र त्याला कृतीने उत्तर देते त्यानुसार महापौर यांनी आज कार्य केले आहे असल्याची चर्चा आहे.

Dyspचे महिला कॉन्स्टेबल सोबत स्वीमिंग पूलमध्ये अश्लील चाळे viral video
नवी दिल्ली : राजस्थानच्या उदयपुर मधील एका रिसॉर्टमध्ये महिला पोलिस शिपाई सोबत डीएसपी अश्लील चाळे करत असल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. स्वीमिंग टॅंकमध्ये डीएसपी आणि महिला पोलीस शिपाई अश्लील चाळे करत आहेत. सोबत महिलेचा सहा वर्षांचा मुलगा आहे. हा  व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी उदयपूर येथील रिसॉर्टवर छापेमारी करत निंलबित डीएसपी हिरालाल सैनी DySP Hiralal Saini याला अटक केली आहे.
Edited by : Mangesh Mahale 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com