Shinde
Shinde

शिंदे ग्रामपंचायतीत कॅांग्रेसचे रतन जाधव यांनी बाजी मारली

नाशिक- पुणे महामार्गावरील बहुचर्चीत व राजकीयदृष्ट्या संदेवनशील शिंदे ग्रामपंचायत निवडणुकीत प्रस्थापित व माजी सरपंच संजय तुंगार यांचा पॅनेलचा धुव्वा उडाला. कॅांग्रेसचे नेते रतन जाधव व सहकारी यांच्या ग्रामविकास पॅनेलने सतरा पैकी चौदा जागा जिंकल्या. त्यामुळे श्री. तुंगार यांना मोठा राजकीय धक्का बसला.

नाशिक : नाशिक- पुणे महामार्गावरील बहुचर्चीत व राजकीयदृष्ट्या संदेवनशील शिंदे ग्रामपंचायत निवडणुकीत प्रस्थापित व माजी सरपंच संजय तुंगार यांचा पॅनेलचा धुव्वा उडाला. कॅांग्रेसचे नेते रतन जाधव व सहकारी यांच्या ग्रामविकास पॅनेलने सतरा पैकी चौदा जागा जिंकल्या. त्यामुळे श्री. तुंगार यांना मोठा राजकीय धक्का बसला. 

शिंदे ग्रामपंचायत निवडणुकीची मतमोजणी आज सकाळी झाली. यामध्ये धुरंधर पॅनेलच्या विद्यमान सरपंच माधुरी तुंगार आणि पॅनेलचे नेते व नाशिक बाजार समितीचे संचालक संजय तुंगार या दोघांचाही पराभव झाला. त्यांच्या पॅनेलचे नितीन शिवाजी जाधव, रिना प्रकाश मते, तान्हाजी गंगाधर जाधव हे तीन सदस्य विजयी झाले. उर्वरीत सर्वच पॅनेलचा पराभव झाला. प्रारंभी तुंगार कुटुंबियांची सत्ता होती. जिल्हा परिषद गटातील हे मोठे गाव असल्याने तालुक्याच्या राजकारणावर त्याचा प्रभाव आहे. त्यामुळे या निवडणूक निकालाचा तालुक्याच्या राजकारणावर परिणाम होणार आहे. त्यामुळे त्याची चर्चा आहे. 

ग्रामविकासला 14 जागा

कॅांग्रेसचे नेते व माजी सरपंच रतन जाधव यांच्या नेतृत्वाखालील ग्रामविकास पॅनेलला चौदा जागा मिळाल्या. कैलास भांगरे, ज्ञानेश्वर मते, शुभम जाधव आणि गोरख जाधव या पॅनेलचे नेते होते. या पॅनेलचे विजयी उमेदवार असे, ज्ञानेश्वर दादा जाधव, सुप्रिया किरण तुंगार, हिराबाई विश्वनाथ जाधव (प्रभाग 2), बाजीराव सुरेश जाधव, वंदना भाऊसाहेब जाधव, अश्वीनी किरण साळवे (प्रभाग 3), शोभा चंद्रभान तुंगार, गणपत तुळशीराम जाधव (प्रभाग 4), गोरख रामचंद्र जाधव, अर्चना संदीप जाधव, भाऊराव रामभाऊ धुळे (प्रभाग 5), बालम शिवाजी बोराडे, अनिता संजय तुंगार, संगीता तानाजी बोराडे (प्रभाग 6).
....     
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com