Shetkari Sanghtan will make agitation at M. P. House | Sarkarnama

खासदारांच्या घरा समोर शेतकरी संघटेनेचे  "राख रांगोळी" आंदोलन*

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 17 सप्टेंबर 2020

कांदा निर्यातबंदीच्या निषेधार्थ शेतकरी संघटना खासदारांच्या घरा समोर राख रांगोळी आंदोलन करणार आहे. शेतकर्‍यांचे प्रतिनिधी असलेल्या खासदारांनी लोकसभेत आवाज उठवून निर्यातबंदीचा आदेश मागे घेण्यास सरकारला भाग पाडावे.

नाशिक :  कांदा निर्यातबंदीच्या निषेधार्थ शेतकरी संघटना खासदारांच्या घरा समोर राख रांगोळी आंदोलन करणार आहे. शेतकर्‍यांचे प्रतिनिधी असलेल्या खासदारांनी लोकसभेत आवाज उठवून निर्यातबंदीचा आदेश मागे घेण्यास सरकारला भाग पाडावे, अन्यथा त्यांच्या घरासमोर हे आंदोलन करण्यात येणार आहे. 

शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आनिल घनवट यांनी यासंदर्भात पत्रक प्रसिद्धीस दिली आहे. गेली सहा महिने ‍शेतकर्‍यांनी मातीमोल भावाने कांदा  विकला. नुकताच किमान खर्च भरुन निघेल असे भाव मिळू लागले होते. त्यावर केंद्र शासनाने अचानक निर्यातबंदी करुन कांद्याचे भाव पाडले. शेतकरी संकटात असताना शेतकर्‍यांना वार्‍यावर सोडणार्‍या सरकारला अशा पद्धतीने शेतकर्‍यांचे आर्थिक नुकसान करण्याचा कोणताही अधिकार नाही. या निर्यातबंदीमुळे शेतकर्‍यांचेच नव्हे तर देशाचेही मोठे आर्थिक नुकसान होणार आहे. निर्यातबंदी करुन केंद्र सरकारने शेतकर्‍यांच्या प्रपंचाची राख रांगोळी केली आहे.

शेतकर्‍यांनी निवडुन दिलेल्या लोकप्रतिनिधींनी शेतकर्‍यांची बाजू मांडण्याचे काम लोकसभेत करायचे असते. परंतू शेतकर्‍यांनी निवडुन दिलेले खासदार आपले कर्तव्य विसरले आहेत. त्यांच्या कर्तव्याची त्यांना जाणीव करुन देण्यासाठी व कांदा निर्यातबंदी करुन शेतकर्‍यांच्या प्रपंचाची राख रांगोळी होत असल्याची कल्पना देण्यासाठी, येत्या २३ सप्टेंबर रोजी, महाराष्ट्रातील सर्व पक्षांच्या खासदारांच्या घरासमोर, १४ सप्टेंबर  रोजी केंद्र शासनाने काढलेला निर्यातबंदी आदेश जाळून कांद्याची रांगोळी काढण्याचे आंदोलन शेतकरी संघटनेतर्फे केले जाईल. 

जून महिन्यात केंद्र शासनाने शेती माल व्य़ापार कायद्यात दुरुस्ती करुन शेतीमालाचा व्यापार खुला केला. शेतमाल कुठेही विकण्याची परवानगी दिली, कांदा आवश्यक वस्तू कायद्यातुन वगळला आहे. शेतकरी संघटनेने शासनाच्या या निर्णयाला पाठिंब‍ ही दिला होता. पण तिनच महिन्यात पुन्हा निर्यातबंदी लादुन शेतकर्‍यांचा विश्वास घात केला आहे. देशांतर्गत तसेच विदेशातही कांद्याला चांगली मागणी असताना केलेली निर्यातबंदी ही  शेतकर्‍यां बरोबर निर्यातदारांचे ही मोठे नुकसान करणारी आहे. अंतरराष्ट्रीय बाजारात भारताची विश्वासहार्यता संपत चालली आहे. निर्याती बाबत भारताच्या धरसोड भुमिकेमुळे भारताकडुन कांदा आयात करणारे देश इतर देशांकडे वळत आहेत.जागतिक कांदा बाजार एकेकाळी ऐंशी टक्के असलेला भारताचा वाटा आता  चाळीस टक्क्यांवर आला आहे. त्यामुळे त्वरित निर्यातबंदीचा आदेश मागे घ्यावा.
....
 

https://scontent.fpnq6-1.fna.fbcdn.net/v/t39.2365-6/12726927_46073809745...

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख