शरद पवारांकडून पाटील कुटुंबियांचे सांत्वन  - Sharad pawar visit Vinayak Patil home and pay Homage | Politics Marathi News - Sarkarnama

शरद पवारांकडून पाटील कुटुंबियांचे सांत्वन 

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 28 ऑक्टोबर 2020

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज दिवंगत कॉंग्रेस नेते, माजी मंत्री विनायकदादा पाटील यांच्या निवासस्थानी भेट दिली. यावेळी त्यांनी पाटील कुटुंबियांचे सांत्वन केले.

नाशिक : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज दिवंगत कॉंग्रेस नेते, माजी मंत्री विनायकदादा पाटील यांच्या निवासस्थानी भेट दिली. यावेळी त्यांनी पाटील कुटुंबियांचे सांत्वन केले. 

ज्येष्ठ नेते विनायकदादा पाटील यांचे नुकतेच निधन झाले. श्री. पाटील हे श्री. पवार यांचे निकटवर्तीय होते. राजकारणापलिकडे त्यांचे घनीष्ठ संबंध असल्याने गेल्या चाळीस वर्षात त्यांनी आपल्या राजकीय, सामाजिक वाटचालीत राजकारण बाजूला ठेऊन त्यांचे संबंध कायम होते. श्री. पवार यांच्या नाशिक दौऱ्यात ते नेहेमी बरोबर असत. श्री. पाटील यांचे गेल्या आठवड्यात निधन झाले. त्यामुळे श्री. पावर यांनी आज नाशिकला येऊन त्यांच्या कुटुंबीयांची विचारपूस केली. प्रारंभी त्यांनी श्री. पाटील यांच्या प्रतिमेला फुले अर्पण करुन श्रद्धांजली वाहिली. यावेळी श्री. पाटील यांचे कुटंबीय, आप्त उपस्थित होते. 

यावेळी दिवंगत विनायक दादा पाटील यांचे बंधू सुरेश बाबा पाटील, माजी आमदार हेमंत टकले, आमदार दिलीप बनकर, माजी खासदार समीर भुजबळ, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष ऍड रवींद्र पगार, कोंडाजी मामा आव्हाड, फिरोज मसानी आदी उपस्थित होते. 
... 
 

https://scontent.fdel1-3.fna.fbcdn.net/v/t39.2365-6/12726927_46073809745...

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख