कोरोनाचा हिशेब घेण्यासाठी शरद पवार शुक्रवारी नाशिकला!

शहर व जिल्ह्यातील कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे येत्या शुक्रवारी नाशिकला येत आहेत. यावेळी विविध घटकांशी चर्चा करतील. कोरोना कसा नियंत्रणात आणायचा, याविषयी नेमका कार्यक्रम तसेच दिशादर्शन यातून प्रशासनाला होईल.
कोरोनाचा हिशेब घेण्यासाठी शरद पवार शुक्रवारी नाशिकला!

नाशिक : शहर व जिल्ह्यातील कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे येत्या शुक्रवारी नाशिकला येत आहेत. यावेळी ते विविध घटकांशी चर्चा करतील. कोरोना कसा नियंत्रणात आणायचा, याविषयी नेमका कार्यक्रम तसेच दिशादर्शन यातून प्रशासनाला होईल. विशेषतः शरद पवार नाशिकला येणार असल्याने कार्यकर्त्यांचा आत्मविश्‍वास त्यातून वाढेल. 

नाशिक शहरात कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी यापूर्वी पुणे, सोलापूरसह विविध भागांचा दौरा केला आहे. या भागात भेट देत त्यांनी कोरोनाच्या स्थितीचा आढावा घेतला. त्यामुळे त्यांचा दौरा काम करणाऱ्या सामाजिक संस्था, कार्यकर्ते, सेवाभावी कार्यकर्ते तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांनाही त्यातून नेमकेपणाने काम करण्याची दिशा मिळाल्याने उपयुक्त ठरला. राजकीयदृष्ट्या देखील हा दौरा चर्चेचा विषय ठरला होता. 

यासंदर्भात मिळालेली माहिती अशी, की ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या समवेत राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे देखील येणार आहेत. दुपारी दोनला त्याचे आगमण होईल. त्यानंतरचे नियोजन अद्याप निश्‍चित झालेले नाही. यापूर्वीच्या दौऱ्यात श्री. पवार यांनी प्रशासनाबरोबर बैठक घेताना फक्त निवडक सूचना केल्या होत्या. त्यात कोरोना विषयक चाचण्यांची स्थिती, त्यात किती वाढ करावी, त्याची स्थिती, निष्कर्ष, मृकत्यूदर कसी कमी करता येईल, त्यासाठी नेमकेपणाने काय करावे, नागरीकांना दिलासा मिळेल असे काय काय केले पाहिजे, यांसह प्रामुख्याने कोरोनाचा संसर्ग नियंत्रणावर त्यांचा भर होता. त्यामुळे सध्या कळीचा मुद्दा बनलेल्या नाशिकला ते येत आहेत. त्यामुळे अनेकांना या दौऱ्याविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे. 

कोरोनाची संसर्ग साखळी खंडीत करण्यासाठी विरोधी पक्षांकडून सातत्याने शहरात लॉकडाउन करावे ही मागणी केली जात आहे. काही भागात नागरीकांनी परस्पर आपल्या भागात अडथळे निर्माण करुन बंद केल्याच्या घोषणा केल्या आहेत. मात्र गेले चार महिने कोरोनाची स्थिती अडचण निर्माण करते आहे. त्यामुळे शहराचे अर्थचक्र पुर्वपादवर येणे आवश्‍यक आहे. विशेषतः मजुर, कामगार, उद्योग, व्यावसाय, दुकाने सुरु करण्यावर भर आहे. त्यामुळे लॉकडाउन नव्हे तर अनलॉकडाउन हवे आहे. त्यासाठी गेल्या आठवड्यात पालकमंत्री छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री नाशिकला दौरा करतील, असे म्हटले होते. मात्र आता थेट शरद पवार व आरोग्यमंत्रीच येत आहेत. त्यानंतर मुख्यमंत्री येतील, असे समजते. 
... 

मुख्यमंत्र्यांशी या विषयावर चर्चा झाली आहे. कोरोनावरील उपाययोजनांबाबत शासन अतिशय गंभीरपमे काम करीत आहे. आता राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार तसेच राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे शुक्रवारी नाशिकला येत आहेत. कोरोनाविषयक आढावा घेऊन ते सगळ्यांना मार्गदर्शन करतील. नाशिककर कोरोनाला निश्‍चित पराभूत करतील.- छगन भुजबळ, पालकमंत्री. 
... 
 

https://scontent-frt3-2.xx.fbcdn.net/v/t39.2365-6/12726927_460738097457654_855104592_n.png?_nc_cat=103&_nc_sid=ad8a9d&_nc_ohc=m6EI_UoaddIAX9M3OZH&_nc_ht=scontent-frt3-2.xx&oh=94d37bbcfa4d7b2f6bcfe3f4d333d071&oe=5F3CD827

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com