शरद पवार म्हणाले, कांदा प्रश्‍नावर आजच केंद्राशी बोलणार! - Sharad Pawar talk to center on Onion Issue Today Itself | Politics Marathi News - Sarkarnama

शरद पवार म्हणाले, कांदा प्रश्‍नावर आजच केंद्राशी बोलणार!

संपत देवगिरे
बुधवार, 28 ऑक्टोबर 2020

कांदा उत्पादक शेतकरी, व्यापारी यांचे जे प्रश्‍न आहेत. त्याबाबत त्यांनी राज्य सरकारकडून अपेक्षा करु नयेत. हे प्रश्‍न राज्याच्या आखत्यारीत नाहीत. केंद्र शासनाने त्याबाबत निर्णय घेणे अपेक्षीत आहे. त्यामुळे यासंदर्भात आजच केंद्र शासनाशी बोलणार आहे. असे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज येथे सांगितले.

नाशिक : कांदा उत्पादक शेतकरी, व्यापारी यांचे जे प्रश्‍न आहेत. त्याबाबत त्यांनी राज्य सरकारकडून अपेक्षा करु नयेत. हे प्रश्‍न राज्याच्या आखत्यारीत नाहीत. केंद्र शासनाने त्याबाबत निर्णय घेणे अपेक्षीत आहे. त्यामुळे यासंदर्भात आजच केंद्र शासनाशी बोलणार आहे. येत्या एक दोन दिवसांत दिल्लीत कांदा उत्पादक शेतकरी व व्यापाऱ्यांसह केंद्रात ज्यांना निर्णयाचा अधिकार आहे, त्यांच्याशी बैठक घेऊ, असे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज येथे सांगितले. 

खासदार पवार आज नाशिक दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी भुजबळ नॉलेज सिटी संकुलात कांदा उत्पादक शेतकरी, व्यापारी व बाजार समितीच्या पदाधिकाऱ्यांशी या प्रश्‍नांवर चर्चा केली. यावेळी उपस्थितांनी त्यांना विविध अडचणी सांगितल्या. कांदा उत्पादकांच्या, व्यापारी यांच्या विविध व्यथा मांडल्या. हे प्रश्‍न तातडीने साडवावेत, अशी मागणी केली.

यावर श्री. पवार यांनी कांदा उत्पादकांनी राज्य सरकारकडून फारशी अपेक्षा ठेऊ नये. कारण यातील कोणताही प्रश्‍न राज्य शासनाच्या अखत्यारीतील नाही. निर्यातबंदी, आयात, कांदा साठवणूकीची मर्यादा, वाहतूकीचे निर्बंध हे सर्व विषय केंद्र शासनाच्या आखत्यारीतील आहेत. त्याबाबतचे निर्णय केंद्र सरकारकडून देशपातळीवर घेण्याचे विषय आहेत. यासंदर्भात केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयाचा त्रास्त कांदा उत्पादकांना होत आहे. त्यामुळे केंद्र शासनाशी बोलावे लागले. त्यांच्याकडून याबाबत निर्णयांची दुरुस्ती करावी लागेल. 

ते म्हणाले, नाशिकला आल्यावर कांदा विषयावर चर्चा झाली नाही, असे कधी होत नाही. देशात कांदा पिकवणारी जी राज्ये आहेत. त्यात महाराष्ट्रात नाशिक आघाडीवर आहे. येथील शेतकरी परिश्रमाने उत्तम दर्जाचा व मोठ्या प्रमाणात कांदा पिकवतो. टोमॅटो, द्राक्ष, डाळींब, कांदा ही येथील प्रमुख पीके आहेत. केंद्र शासनाने जिवनाश्‍यक वस्तूंची सूची तयार केली. त्यातून काही वस्तूंनी वगळले. ते चांगले केले. मात्र त्याची कार्यवाही केली नाही, त्याचे कारण समजू शकत नाही. एकीकडे कांदा निर्यातबंदी केली व दुसरीकडे आयात सुरु केली. कांदा वाहतूक करताना तीस टन क्षमतेचे ट्रक असले तरच ते परवडते. मात्र केंद्राने ही क्षमता पंचवीस टन केली. साठा मर्यादा आणली. त्याचा त्रास कांदा उत्पादक शेतकरी व व्यापारी यांना होतो आहे. त्याबाबत तातडीने कार्यवाही केली पाहिजे. ते करण्यात सरकार का विलंब करते आहे हे समजत नाही. यासंदर्भात आजच केंद्र शासनाशी बोलणार आहे. याविषयी धोरणात्मक निर्णय घेण्याचा अधिकार असलेल्यांशी नवी दिल्लीत उद्या किंवा परवा चर्चा करुन हा प्रश्‍न त्यांच्यापर्यंत पोहोचवू, असे श्री. पवार म्हणाले. 

यावेळी माजी खासदार समीर भुजबळ, माजी आमदार हेमंत टकले, आमदार दिलीप बनकर, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हा अध्यक्ष रवींद्र पगार, शहर अध्यक्ष रंजन ठाकरे, कोंडाजीमामा आव्हाड आदी उपस्थित होते. 
.... 
 

https://scontent.fdel1-3.fna.fbcdn.net/v/t39.2365-6/12726927_46073809745...

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख