भाजप विरोधात एकत्र आल्याची चांगली फळं दिसताहेत ! 

भारतीय जनता पक्षाला दूर ठेवण्यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस असे आम्ही तीघे एकत्र आलो. त्याची चांगली फळं दिसताहेत, अशी भावना सध्या तिन्ही पक्षांत आहे, असे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज येथे सांगितले.
भाजप विरोधात एकत्र आल्याची चांगली फळं दिसताहेत ! 

नाशिक : भारतीय जनता पक्षाला दूर ठेवण्यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस असे आम्ही तीघे एकत्र आलो. त्याची चांगली फळं दिसताहेत, अशी भावना सध्या तिन्ही पक्षांत आहे. याचा अर्थ या पक्षांनी स्वतःचा विस्तार करायचा नाही, असे होत नाही. किंवा पक्षविस्तार केला तर आम्ही एकमेकांना सोडलं असाही होत नाही. प्रत्येक पक्षाला संघटनात्मक विस्ताराचा अधिकार आहे. त्यानुसार ते काम करीत असतात, असे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज येथे सांगितले. 

नुकतेच शिवसेना नेते संजय राऊत यांनी शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात विधानसभेवर स्वबळावर भगवा फडकणार, असे वक्तव्य केले होते. हा धागा पकडून पत्रकारांनी श्री. पवार यांना विचारले होते. यावेळी ते म्हणाले, भारतीय जनता पक्षाला सत्तेतून दूर ठेवण्यासाठी आम्ही तिन्ही पक्ष राज्यात एकत्र आलो. त्यातून राज्याचा कारभार केला जात आहे. त्याची चांगली फळं दिसत असल्याची भावना व्यक्त होत आहे. त्यामुळे या आघाडीतील एखादा पक्ष स्वतःचे काही संघटनात्मक कार्यक्रम राबवत असेल तर त्याबाबत फार मनाला लावून घेण्याचा विषय नसतो. विधानसभेवर भगवा फडकणार हे भाषण मी गेले तीस वर्षे एैकत आलो आहे. त्यावर एव्हढी चर्चा कशासाठी? असा प्रश्‍न त्यांनी केला. 

ते पुढे म्हणाले, नुकताच राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे काही कार्यक्रम झाले. त्याचा अर्थ आम्ही कॉंग्रेसला सोडले, असा होत नाही. कॉंग्रेसने देखील पक्षविस्तारासाठी काही उपक्रम राबविले तर, त्याचा वेगळा अर्थ निघत नाही, शिवसेनेने मेळावे घेतले, काही विधाने केली. संघटनात्मक विस्ताराचे कार्यक्रम केले, तर त्याचा अर्थ त्यांनी महाविकास आघाडीतील पक्षांपेक्षा वेगळा विचार मांडला असा होत नाही. प्रत्येक पक्षाला संघटनात्मक विस्ताराचा. कार्यक्रम राबविण्याचा अधिकार आहे. याबाबत काही बोलायचेच असेल, तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि कॉंग्रेसचे अध्यक्ष बाळासाहेब थोरात ठरवतील. त्यांनाच याविषयी विचारा. 

पंकजाचे `ते` ट्‌वीट ! 
भाजप नेत्या पंकजा मुंडे या आपल्या जवळ येत आहेत का? यावर श्री. पवार म्हणाले, असे काहीच नाही. एका साखर कारखान्याच्या प्रतिनिधी म्हणून पंकजा मुंडे वसंतदादा शुगर इन्स्टीट्यूटच्या बैठकीला उपस्थित होत्या.  त्याचा वेगळा अर्थ काढू नये. त्यानंतर त्यांनी माझ्याविषयी चांगली भावना व्यक्त करणारे ट्‌विट केल. त्यानंतर ते डिलीट केले. त्याबाबत मला काही माहिती नाही. अर्थात त्यामुळे मुंडे माझ्या संपर्कात आल्याने भाजपच्या एखाद्या नेत्याने चिंता व्यक्त केली असेल, तर त्याचीही माहिती माझ्याकडे नाही. 
.... 


 

https://scontent.fdel1-3.fna.fbcdn.net/v/t39.2365-6/12726927_460738097457654_855104592_n.png?_nc_cat=103&ccb=2&_nc_sid=ad8a9d&_nc_ohc=c_9Vdee0so0AX9VKLNT&_nc_ht=scontent.fdel1-3.fna&oh=7963d473328f61bfbd708075dbc48575&oe=5FBF5CA7

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com