शरद पवार दौरा...खुऽऽश होऊन शेतक-याने काढले बोलके चित्र! - Sharad Pawar Nashik Visit...happy farmers draw a picture | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

उर्मिला मातोंडकर मातोश्रीवर दाखल

शरद पवार दौरा...खुऽऽश होऊन शेतक-याने काढले बोलके चित्र!

संपत देवगिरे
गुरुवार, 29 ऑक्टोबर 2020

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बुधवारी नाशिकचा दौरा केला. याविषयी दिल्लीत संबंधीत विभागाच्या प्रमुखांसोबत बैठक घेण्याचे त्यांनी जाहिर केले. त्यामुळे कांदा उत्पादक खुऽऽश झाले. यावर ठेंगोडा (बागलाण) येथील किरण दादाजी मोरे या शेतक-याने पवारांच्या भेटीचे फलित व्यक्त करणारे चित्र रेखाटले आहे.

नाशिक : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बुधवारी नाशिकचा दौरा केला. यावेळी त्यांनी कांदा उत्पादक व्यापारी व शेतकरी यांच्याशी चर्चा केली. कांदा उत्पादकांचे प्रश्‍न केंद्र शासनाशी संबंधीत असल्याने कांदा उत्पादकांसह दिल्लीत संबंधीत विभागाच्या प्रमुखांसोबत बैठक घेण्याचे त्यांनी जाहिर केले. पवार यांच्या या निर्णयाने शेतक-यांना दिलासा मिळाला. कांदा उत्पादक शेतकरी चांगलेच खुऽऽश झाले. यावर ठेंगोडा (बागलाण) येथील किरण दादाजी मोरे या शेतक-याने पवारांच्या भेटीचे फलित व्यक्त करणारे चित्र रेखाटले आहे. हे चित्र नाशिककरांत चांगलेच चर्चेचा विषय ठरले. 

कांदा निर्यातबंदी, शासनाकडून झालेली कांदा आयात, व्यापारी वर्गावर साठवणूकीची मर्यादा आदी निर्णय गेल्या आठवड्यात केंद्र शासनाने घेतले. त्यामुळे शेतकरी, बाजारात कांदा नसतांना त्याचे दर कोसळले. विशेष म्हणजे व्यापारी वर्गावर कारवाई झाल्याने त्यांनी अघोषीत लिलाव बंद केले. त्याच्या तीव्र प्रतिक्रीया जिल्ह्यात उमटल्या होत्या. शेतकरी अस्वस्थ होते. या पार्श्‍वभूमीवर शरद पवार यांना कांदा उत्पादकांशी चर्चा केली. यावेळी शेतकरी व व्यापारी यांच्या अडचणी समजून घेतल्या. त्यांच्या प्रश्‍नांवर तोडगा काढण्यासाठी विविध पर्याय सांगितले. सध्याचे जे निर्णय आहेत, ते प्रामुख्याने केंद्र शासनाच्या वाणिज्य विभागाने घेतले आहेत. त्याबाबत संबंधीत विभागांत समन्वय नाही. त्यामुळे केंद्र शासनाकडे हा प्रश्‍न मांडणार. संंबधीत विभागाच्या प्रमुखांशी तातडीने वेळ घेऊन कांदा उत्पादक व व्यापारी प्रतिनिधींसह नवी दिल्लीत चर्चा करुन हे प्रश्‍न सोडविण्याचे आश्‍वासन त्यांनी दिले. त्यामुळे गेले पंधरा दिवस याबाबत चाचपडत असलेल्या कांदा उत्पादकांना दिलासा मिळाला. कोणी तरी त्यांच्याशी बोलले. त्यांचे प्रश्‍न समजून घेतले. याचे त्यांनी समाधान वाटले. विशेष या भेटीचे फलित म्हणजे, कांदा उत्पादकांना घेऊन शरद पवार दिल्लीला जाणार हा संदेश त्यातून गेला. 

शरद पवार यांच्या तप्तरतेने जिल्ह्यातील कांदा उत्पादकांना एक दिलासा मिळाला हे नक्की. शेतकऱ्यांचा आजही श्री. पवार यांच्यावर किती विश्वास आहे, हे सांगणारे बोलके रेखाचित्र ठेंगोडा (ता.सटाणा) येथील कांदा उत्पादक किरण दादाजी मोरे यांनी काढले आहे. त्यांचे हे चित्र सोशल मिडीयावर देखील व्हायरल होते आहे. या सबंध दौ-याचे नेमके फलित त्यांनी बोलक्या रंग, रेषांतून रेखाटले.
....

https://scontent.fpnq6-1.fna.fbcdn.net/v/t39.2365-6/12726927_46073809745...

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख