शरद पवार म्हणाले, `कोरोनाच्या उपचारासाठी गरीब रुग्णांना प्राधान्याने मदत करा` - Sharad pawar corona meeting, says dicision will be taken by CM | Politics Marathi News - Sarkarnama

शरद पवार म्हणाले, `कोरोनाच्या उपचारासाठी गरीब रुग्णांना प्राधान्याने मदत करा`

संपत देवगिरे
शुक्रवार, 24 जुलै 2020

आगामी काळात कोरोना रुग्णवाढीची शक्यता लक्षात घेता, उपचाराची पुरेशी व्यावस्था नाशिक महापालिकेकडे आहे. बेड वाढविण्यास त्यांना सांगितले आहे. गरीब रुग्णांना उपचारासाठी साह्य म्हणून सीएसआर फंडाचा पर्याय वापरता येईल,

नाशिक : आगामी काळात कोरोना रुग्णवाढीची शक्यता लक्षात घेता, उपचाराची पुरेशी व्यावस्था नाशिक महापालिकेकडे आहे. बेड वाढविण्यास त्यांना सांगितले आहे. गरीब रुग्णांना उपचारासाठी साह्य म्हणून सीएसआर फंडाचा पर्याय वापरता येईल, असे प्रतिपादन ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केले. 

श्री. पवार म्हणाले,  कोरोना संदर्भात मुख्यमंत्र्यांना नाशिकसह विविध भागांचा दौरा करण्याची इच्छा आहे. कदाचीत ते नाशिकलाही येतील. सध्या संबंधीत मंत्र्यांसह आम्ही फिल्डवर निरीक्षण करीत आहोत. या सर्व अनुभवांची माहिती संंबधीत मुख्यमंत्र्यांना अवगत करतील.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या उपस्थितीत आज येथे बैठक झाली. यावेळी आरोग्यमंत्री राजेश टोपे, पालकमंत्री छगन भुजबळ, विधानसभा उपसभापती नरहरी झिरवाळ, कृषिमंत्री दादाजी भुसे उपस्थित होते. 

याविषयी श्री. पवार म्हणाले, नाशिक शहरात पुढील महिन्यात 15 ते 31 दरम्यान जी रुग्णसंख्या वाढेल, त्याबाबत उपाययोजनांसह प्रशासन सज्ज आहे. त्याची सविस्तर माहिती अधिका-यांनी बैठकीत दिली. त्याबाबत महापालिकेची तयारी व सुविधा पुरेशी आहे. त्यांना जे डॅाक्टर लागणार आहेत, त्यासाठी नाशिकला आरोग्य विज्ञान विद्यापीठ आहे. राज्यात तयार होणारे सर्व डॅाक्टर त्यांच्या नियंत्रणाखाली असतात. त्यांचा उपयोग पुर्णतः कोरोना उपचारासाठी करता येईल. त्याबाबत जिल्हाधिकारी स्तरावर विचार होईल. मात्र डॅाक्टरांनीही स्वतः पुढे यावे, अन्यथा जिल्हा प्रशासनाकडे आपत्ती निवारण कायद्याच्या तरतुदी आहेत. त्याचा वापर करण्याची वेळ येऊ देऊ नये, ही अपेक्षा आहे. 

यावेळी आरोग्यमंत्री टोपे यांनी बैठकीतील कोरोनाविषयक सुविधा, स्थिती, उपचार, औषधे, नवे दवाखाने याविषयी माहिती दिली. ते म्हणाले, आम्ही काही धोरणात्मक निर्णय घेतले आहे. यापुढे खाजगी रुग्णालयांना काहीही दर आकारता येणार नाहीत. यासंदर्भात आम्ही दोन परिक्षक नियुक्त करु. एक परिक्षक रुग्णांना बेड अलॅाटमेंटचे काम करेल. दुसरा परिक्षक उपचार व बीलांची तपासणी करील. त्यांनी तपासून मान्यता दिल्यावर रुग्णांना बीले दिले जातील. त्यामुळे उपचाराबाबत खाजगी रुग्णालयांविषयीच्या बहुतांश तक्रारी दुर होतील. महापालिका आगामी काळात नवे रुग्णालये उभारणार आहे. त्यांना लागणारी औषधे, साहित्य याविषयी शासनाने संबंधती कंपन्यांशी बोलून दर निश्चित केले आहे. जिल्हाधिकारी व महापालिका आयुक्तांनी एकत्रीतपणे तो निर्णय घ्यावा. तातडीने औषधे उपलब्ध करावीत, असा सुचना दिल्या आहेत.

फडणवीसांनी राजकारण करु नये
भारजीय जनता पक्षाच्या लोकप्रतिनिधींनी या बैठकीवर बहिष्कार टाकला होता. यासंदर्भात ते म्हणाले, कोरोना हे मोठे संकट आहे. त्यातून आपल्या सगल्यांना बाहेर पडायचे आहे. त्याचा यशस्वी मुकाबला करायचा आहे. त्यात राजकारण नको. देवेंद्र फडणवीस व त्यांच्या सहका-यांनी याबाबत राजकारण करु नये.

या बैठकीस खासदार हेमंत गोडसे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, आमदार सुधीर तांबे, माणिकराव कोकाटे, किशोर दराडे, नितीन पवार, हिरामण खोसकर, सरोज आहिरे, मालेगावच्या महापौर ताहेरा शेख, माजी खासदार समीर भुजबळ, माजी आमदार पंकज भुजबळ, राज्य टास्क फोर्सचे प्रमुख डॉ.सुधाकर शिंदे, विभागीय आयुक्त राजाराम माने, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे, मुख्याधिकारी लीना बनसोडनाशिक परिक्षत्राचे पोलिस महानिरीक्षक छेरिंग दोरजे, पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील, पोलिस अधीक्षक डॉ. आरती सिंह, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.कपिल आहेर यांच्यासह प्रमुख अधिकारी उपस्थित आहेत.

https://scontent.fpnq6-1.fna.fbcdn.net/v/t39.2365-6/12726927_46073809745...

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख