नाशिकला जिल्हा पोलिस अधीक्षकपदी शहाजी उमाप 

जिल्हा पोलिस अधीक्षकपदी मुंबईचे उपआयुक्त शहाजी उमाप यांची नियुक्ती झाली आहे. गतवर्षी सप्टेबमध्ये जिल्हा पोलिस अधीक्षकपदी नियुक्त झालेले सचिन पाटील यांचा कार्यकाळ पूर्ण होण्याआधीच त्यांची बदली झाली.
Shahaji Umap
Shahaji Umap

नाशिक : जिल्हा पोलिस अधीक्षकपदी (Nashik police supritendent) मुंबईचे उपआयुक्त शहाजी उमाप (Shahaji Umap) यांची नियुक्ती झाली आहे. गतवर्षी सप्टेबरमध्ये जिल्हा पोलिस अधीक्षकपदी नियुक्त झालेले सचिन पाटील (Sachin Patil) यांचा कार्यकाळ पूर्ण होण्याआधीच त्यांची बदली झाली. 

श्री उमाप मुंबई येथे व्हीआयपी सुरक्षा विभागात कार्यरत होते. त्यांची नाशिकला बदली करण्यात आली आहे. सचिन पाटील यांची मुंबई येथे राज्य गुप्त वार्ता विभागाच्या उपायुक्तपदी नियुक्ती झाली आहे. त्यांचा कार्यकाळ पूर्ण होण्या आधीच वर्षभरात त्यांची बदली झाल्याने तो चर्चेचा विषय आहे. 

श्री. उमाप हे पुणे जिल्ह्यातील जातेगाव (शिरूर) येथील आहेत. मुंबई पोलिस उपायुक्त पदी असताना उल्लेखनीय सेवेबद्दल त्यांना २०१९ मध्ये राष्ट्पती पदक जाहीर झाले. करडया शीस्तीचे अधिकारी अशी त्यांची ख्याती आहे. त्यांनी विविध ठिकाणी काम केले आहे. १९९६ नवी मुंबई येथे अतिरीक्त आयुक्तपदी असताना मध्ये झालेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परिक्षेत ते उपअधीक्षकांत पहिले आहे. २०१६ मध्ये ते भारतीय पोलिस सेवेत वर्ग झाले. त्यांनी आंबेजोगाई, लातूर, कोल्हापूर येथे उपविभागीय पोलिस अधिकारी म्हणून काम केले आहे. पिंपरी-चिंचवड, नवी मुंबई, कोल्हापूर व नांदेड येथे अतिरिक्त पोलिस अधीक्षक म्हणून काम केले आहे. २०१२ मध्ये ते नांदेडचे पोलिस अधीक्षक म्हणून काम करताना २०१२ मध्य तंटामुक्ती योजनेत नांदेड जिल्हा राज्यात प्रथम आला होता. एक हजाराहून अधिक गावे त्यांनी तंटामुक्त केली.      

राज्य शासनाच्या गृह विभागाने राज्यातील वरिष्ठ पोलिसअधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश गणेशोत्सवाच्या पूर्वसंध्येला काढले. यात आहे. धुळ्याचे अधीक्षक चिन्मय पंडित यांची नागपूर शहर पोलिस उपायुक्त, तर नंदुरबारचे महेंद्र पंडित कमलाकर यांची पोलिस उपायुक्त, मुंबई शहर येथे बदली झाली आहे. धुळे येथील प्रवीण सी. पाटील, तर नंदुरबार येथे पी. आर. पाटील यांची अधीक्षकपदी नियुक्ती झाली आहे. 

अपर पोलिस अधीक्षकांमध्ये नाशिक ग्रामीणच्या शर्मिला घार्गे यांची औरंगाबादच्या गुन्हे अन्वेषण विभागाच्या अधीक्षकपदी नियुक्ती झाली आहे. त्यांच्या जागी नागरी हक्क संरक्षणच्या पोलिस अधीक्षक माधुरी केदार यांची बदली झाली आहे. चाळीसगाव (जि. जळगाव) चे अपर पोलिस अधीक्षक सचिन गोरे यांची पोलिस अकादमीत, तर राज्य गुप्त वार्ता विभागाचे उपायुक्त रमेश चोपडे यांची चाळीसगावला बदली झाली आहे. श्रीरामपूर (अहमदनगर)च्या अपर पोलिस अधीक्षक दीपाली काळे, नागपूर राज्य गुप्त वार्ता विभागाच्या उपायुक्त अनिता पाटील यांची पोलिस अकादमीत पोलिस अधीक्षकपदी बदली झाली. मुंबई गुन्हे अन्वेषण विभागाचे उपायुक्त अकबर इलाही पठाण यांची नागरी हक्क संरक्षण विभागाच्या पोलिस अधीक्षकपदी नियुक्ती झाली आहे. 
...

हेही वाचा...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com