कठोर निर्बंधांसह नाशिकला अंशतः लॉकडाउन?

जिल्ह्यात गेल्‍या काही दिवसांपासून कोरोनाचा कहर सुरू असून, येत्‍या २ एप्रिलला आढावा बैठकीत लॉकडाउन संदर्भातील निर्णय घेणार असल्‍याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी जाहीर केले होते. मात्र लॉकडाउन नको, अशी राज्‍यस्‍तरावर राजकीय पक्षांची भूमिका असल्‍याची स्‍थिती आहे.
Mask
Mask

नाशिक : जिल्ह्यात गेल्‍या काही दिवसांपासून कोरोनाचा कहर सुरू असून, येत्‍या २ एप्रिलला आढावा बैठकीत लॉकडाउन संदर्भातील निर्णय घेणार असल्‍याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी जाहीर केले होते. मात्र लॉकडाउन नको, अशी राज्‍यस्‍तरावर राजकीय पक्षांची भूमिका असल्‍याची स्‍थिती आहे.

या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात पूर्णऐवजी अंशतः लॉकडाउन करत गर्दीवर नियंत्रण आणण्याच्‍या दृष्टीने प्रशासकीय यंत्रणेतर्फे आखणी केली जात आहे. अर्थचक्र न थांबू देता, कोरोनावर नियंत्रण आणण्यास प्रशासकीय यंत्रणा प्राधान्‍य देत असल्‍याचे संकेत आहेत.

जिल्ह्यात रोज सरासरी दोन हजारांहून अधिक कोरोनाबाधित आढळून येत आहेत. उपचार घेणाऱ्या बाधितांची संख्या ३० हजारांच्‍या उंबरठ्यावर पोचते आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत राहिल्‍यास आरोग्‍य व्‍यवस्‍था कोलमडण्याची परिस्‍थिती उद्‌भवू शकते. परिस्‍थिती आटोक्‍यात आणण्यासाठी लॉकडाउनची अंमलबजावणी करण्याचा प्रशासकीय पातळीवर विचार सुरू आहे. राज्‍य शासनाने या संदर्भातील सर्व अधिकार स्‍थानिक प्रशासनाला दिलेले आहेत. परंतु पूर्णपणे लॉकडाउन करण्यास राजकीय पक्षांकडून विरोध दर्शविला जातो आहे. दुसरीकडे व्‍यापार-उद्योग क्षेत्रातील घटकांकडूनही प्रतिकूल मत व्‍यक्‍त होते आहे. येत्‍या २ एप्रिलपर्यंत अल्‍टिमेटम दिलेला असताना राज्‍यस्‍तरावरही या संदर्भात महत्त्वाची घोषणा होण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे. असे असले तरी जिल्‍हास्‍तरावर पूर्ण लॉकडाउन करण्यापेक्षा निर्बंध अधिक कठोर करण्याला प्राधान्‍य दिले जाणार असल्‍याचे समजते. गर्दीच्या ठिकाणांवर नियंत्रण मिळविताना अर्थचक्र थांबणार नाही, याबाबत सावधगिरी बाळगली जाते आहे.

अशा निर्बंधांची आहे शक्‍यता...
-जीवनावश्‍यक, अत्‍यावश्‍यक बाबी, सेवा सुरू राहणार परंतु गर्दीवर असेल प्रशासनाचे लक्ष.
-सार्वजनिक वाहतूक यंत्रणेवर येऊ शकतात निर्बंध.
-औद्योगिक कारखान्‍यांमध्ये नियमांच्‍या पालनासह कामकाज चालणार.
-शक्‍य त्‍या आस्‍थापनांना वर्क फ्रॉम होमचा पर्याय निवडण्याचे असेल आवाहन.
-मद्य विक्री दुकानांबाबत धोरणात्‍मक निर्णयाची शक्‍यता.
-हॉटेल संदर्भात केवळ पार्सल सेवेला प्राधान्य.
... 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com