मुख्यमंत्री ठाकरेंच्या वाढदिवशी ज्येष्ठ शिवसैनिकांचा सन्मान

कळवण तालुका शिवसेनेतर्फे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस आगळ्यावेगळ्या पध्दतीने साजरा करण्यात आला. शिवसेनेच्या येथील जुन्या व ज्येष्ठ सैनिकांचा सत्कार करून लॉकडाऊन काळात हातावर काम करणाऱ्या शिवसैनिकांना किराणा साहित्य व भाजीपाला देऊन आधार देण्यात आला.
Kalwan Shivsena
Kalwan Shivsena

कळवण : कळवण तालुका शिवसेनेतर्फे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस (CM Uddhav thakre`s Birthday celebration at Kalwan)  आगळ्यावेगळ्या पध्दतीने साजरा करण्यात आला. शिवसेनेच्या येथील जुन्या व ज्येष्ठ सैनिकांचा सत्कार करून (Senior party workers honoured) लॉकडाऊन काळात हातावर काम करणाऱ्या शिवसैनिकांना किराणा साहित्य व भाजीपाला (Distribution of Groceries) देऊन आधार देण्यात आला.

श्री. ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्ताने कळवण तालुका शिवसेनेने कळवण शहरात व तालुक्यातील जुने व ज्येष्ठ शिवसैनिकांचासत्कार करण्यात आला. कळवण तालुका शिवसेनेतर्फे तालुकाप्रमुख अंबादास जाधव यांच्या नेतृत्वाखाली हा उपक्रम राबवण्यात आला. शिवसेना उपजिल्हाप्रमुख दशरथ बच्छाव, तालुका प्रमुख अंबादास जाधव, सहसंपर्क प्रमुख संभाजी पवार, प्रमुख साहेबराव पगार, उपतालुकाप्रमुख डॉ. दिनेश बागूल, विनोद भालेराव, विभागप्रमुख शीतलकुमार आहिरे, डॉ. पंकज मेणे, उपशहर प्रमुख विनोद मालपुरे, आप्पा बुटे, किशोर पवार, ज्येष्ठ शिवसैनिक संजय बोरसे, अशोकराव जाधव, युवा सेनेचे तालुकाप्रमुख मुन्ना हिरे, विद्यार्थी युवा सेनेचे शहराध्यक्ष सुनील पगार, ललित आहेर, आप्पा बुटे आदी उपस्थित होते.

लॉकडाऊनमुळे अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्याची झळ काही ज्येष्ठ शिवसैनिकांनाही बसली आहे. कळवण शहराबरोबर तालुक्यातील शिवसौनिकांची गरज ओळखून त्यांना तालुका शिवसेनेतर्फे भाजीपाल्यासह किराणा कीट देण्यात आले.
- अंबादास जाधव, तालुकाप्रमुख, कळवण तालुका.

हेही वाचा...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com