संजय राऊत यांची पाठ फिरताच शिवसेनेत बंडाचे निशाण!

शिवसेना नेते, खासदार संजय राऊत या संघटनात्मक बांधनीसाठी दौरा झाला. मात्र या दौऱ्याची परिणीती वेगळीच झाली. खासदार राऊतयांची पाठ फिरताच नेत्यांत वादाची ठिणगी पडून खरे शिवसेना नेते व नुकतेच महापालिकेत सत्तांतराच्या निमित्ताने आलेल्या नगरसेवकांनी एकमेकांवर शरसंधान सुरु केले आहे. त्यामुळे राऊत आले अन् ठिणगी पडली अशी स्थिती झाली आहे.
Jalgao
Jalgao

जळगाव : शिवसेना नेते, खासदार संजय राऊत या(Sanjay Raut tour for organize Shivsena) संघटनात्मक बांधनीसाठी दौरा झाला. मात्र या दौऱ्याची परिणीती वेगळीच झाली. (But it made chronic Disputes in Jalgaon Shivsena) खासदार राऊत (Sanjay Raut) यांची पाठ फिरताच नेत्यांत वादाची ठिणगी पडून खरे शिवसेना नेते व नुकतेच महापालिकेत सत्तांतराच्या निमित्ताने आलेल्या नगरसेवकांनी एकमेकांवर शरसंधान सुरु केले आहे. त्यामुळे राऊत आले अन् ठिणगी पडली अशी स्थिती झाली आहे. 

यानिमित्ताने जळगाव शहरात शिवसेनेचे नेते आले आणि दोन गट पडून गेले असे चित्र बनले आहे. खासदार राऊत, जिल्हा संपर्क प्रमुख संजय सावंत यांना त्यांच्या दौऱ्यातही दोन गट दिसले होते. शिवसेनेतर्फे जिल्ह्यात नवीन नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. त्यावरून जुन्या आणि नव्या कार्यकर्ते, नेत्यांत वाद निर्माण झाला आहे. नव्या नेमणुका या बाहेरून आलेल्या लोकांच्या झाल्याचा आरोप होत आहे. या नियुक्त्यांना नेत्यांसमोरच विरोध केला होता, मात्र त्याकडे दुर्लक्ष झाले. आता जुने नेते म्हणतात चार, चार पक्ष फिरून आलेल्या लोकांना पदे दिली आणि  निष्ठावंत, जुन्या शिवसेना कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांना डावलण्यात आले आहे.

यासंदर्भात नवनियुक्त जिल्हाप्रमुख विष्णु भंगाळे म्हणाले, आम्ही सुरेशदादा जैन यांच्या नेतृत्वाखाली खानदेश विकास आघाडीच्या माध्यमातून शिवसेनेचे काम करीत होतो. मी महापौर होतो. चौथ्यांदा नगरसेवक झालो आहे. मी शिवसेनेचाच नगरसेवक आहे. आपल्यावर केवळ हेतुपुरस्कर आरोप केले जात आहेत. आम्ही  शिवसेनेचे काम अगोदरपासूनच करीत आहोत. जिल्हाप्रमुख म्हणून आपण जळगाव शहर, जळगाव ग्रामीण व अमळनेर तालुक्यात शिवसेना भक्कम करण्याचे काम करणार आहे. 

दरम्यान शिवसेनेच्या जुन्या नेत्यांनी मात्र आलेले सर्व वेगवेगळ्या पक्षातून सत्तेसाठी आले आहेत. त्यांचा कुठला गटच नाही. शिवसेनेत केवळ आम्ही मूळ शिवसेना कार्यकर्ते, नेत्यांचाच घट आहे. दुसरा गट अस्तित्वातच नाही. त्यामुळे हा वाद संपण्याची चिन्हे नाहीत. शिवसेना  नेते पक्षाची संघटनात्मक विस्तारासाठी आले होते. ते मुंबईत गेले अन् वादाची ठिणगी पडली. आता हा वाद मिटवून सर्वांना एकत्र करण्याची जबाबदारी पालकमंत्री व उपनेते गुलाबराव पाटील यांच्यावर आली आहे. ते हा वाद कसा सोडविणार याकडे लक्ष लागले आहे.
...

u

हेही वाचा...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com