संभाजीराजे म्हणाले, "सातारा, कोल्हापूरमध्ये भांडण लावणे बरे नाही!'

मराठा आरक्षणाच्या लढ्यात कोणतेही मनभेद, मतभेद मकोत. दुर्दैवाने त्यात कुठे कुठे दोन गट दिसू लागलेत. त्यात वेळीच एकोपा निर्माण करावा लागेल. एक आमदार सतत मी नेतृत्व करावे, असे पालुपद लावत आहे. यानिमित्ताने सातारा आणि कोल्हापूर यांच्यात भांडण कशाला, हे योग्य नाही.
संभाजीराजे म्हणाले, "सातारा, कोल्हापूरमध्ये भांडण लावणे बरे नाही!'

नाशिक : मराठा आरक्षणाच्या लढ्यात कोणतेही मनभेद, मतभेद मकोत. दुर्दैवाने त्यात कुठे कुठे दोन गट दिसू लागलेत. त्यात वेळीच एकोपा निर्माण करावा लागेल. एक आमदार सतत मी नेतृत्व करावे, असे पालुपद लावत आहे. यानिमित्ताने काहींना सातारा आणि कोल्हापूर यांच्यात भांडण लावायचे आहे. मात्र असे प्रयत्न यशस्वी होणार नाहीत. आम्ही एकच आहोत. एकच राहू, असे छत्रपती, खासदार संभाजीराजे यांनी "सरकारनामा'ला सांगितले. 

सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यानंतर आंदोलनाला दिशा देण्यासाठी शनिवारी नाशिकमध्ये राज्यस्तरीय समन्वयकांची बैठक झाली. या पार्श्‍वभूमीवर ते म्हणाले, मी काल झालेल्या मराठा आरक्षण लढ्याच्या समन्वयकांच्या बैठकीत सविस्तर बोललो आहे. त्यासाठी मी आधी सगळ्यांचा मतप्रवाह समजुन घेतला. त्यानंतर मराठा आरक्षणाच्या लढ्याविषयी भूमिका मांडली. मी नाव घेऊ इच्छीत नाही, मात्र एक आमदार सतत मी नेतृत्व करावे असे पालुपद लावत आहे. हे काही बरोबर नाही. यातून त्यांना काय हेतू साध्य करायचा आहे, हे कळत नाही. अशाप्रकारे भांडण लावून काय हित साधले जाईल?. त्यामुळे समाजानेच त्याची दखल घेऊन त्यांना आवरले पाहिजे. अशाप्रकारे वाद-विवाद निर्माण करीत तुम्ही तीनशे वर्षे मागे जाणार आहात काय?. हे काही योग्य नाही. आम्ही सर्व एक आहोत. सातारा काय अन्‌ कोल्हापूर काय दोन्ही घराणी आम्ही एकच आहोत. त्यात काहीच वाद नाही. कोणी लावण्याचा प्रयत्न देखील करु नये. तसे केले तरी ते यशस्वी होणार नाही. 

ते म्हणाले, मी मराठा आरक्षणाच्या निमित्ताने राज्यभर फिरतो आहे. अनेकांना भेटतो आहे. बैठकांना हजेरी लावतो. त्यात नकळत दोन मतप्रवाह किंवा दोन गट मला दिसतात. यापूर्वी राज्यात जो अभूतपूर्व लढा समाजाने दिला, अत्यंत शांततेने 58 मोर्चे काढले. त्यात सगळे एकवटले होते. कोणतीच दरी नव्हती. मग आत्ताच का असे गट दिसू लागलेत. ही खंत आहे. ते थांबवले पाहिजे. वेळीच ही मतभेदाची दरी भरुन काढली पाहिजे. ते आवश्‍यक आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे, ही आमची ठाम भूमिका आहे. त्यासाठी नेत्यांनी राजकीय पक्षांचे जोडे बाजूला ठेवून एकदिलाने लढ्यात सहभागी होऊन दिल्लीत ताकद दाखवून देण्याची वेळ आली आहे. 
समाजाचे न ऐकता आरक्षणाला स्थगिती 

संभाजीराजे म्हणाले, अनेक वर्षांपासून आरक्षणाची मागणी करताना मराठा समाजाने आंदोलन केली. या आंदोलनाची दखल घेतली जाणार नसेल, तर आता दिल्लीत ताकद दाखविण्याची वेळ आली आहे. ती आपण दाखविणारच. राज्यातील खासदारांनी दिल्लीत ताकद दाखविण्यासाठी दबाव वाढवावा. त्यासाठी राजकीय पक्षांचे जोडे बाजूला ठेवावे. आरक्षणासाठी न्यायालयीन लढाई सुरू ठेवताना दबावाचेही अस्त्र उपसले जाणार आहे. सरकारला खिंडीत गाठण्यासाठी रणनीती आखली जाईल. मराठा समाजाचा आता कुठल्याच सरकारवर विश्‍वास राहिलेला नाही. मागून मिळणार नसेल, तर कुठल्याही क्षणी रस्त्यावर उतरून गनिमीकाव्याने आंदोलन केली जातील. न्यायालयाने निकाल देताना समाजाची बाजू एकून न घेता आरक्षणाला स्थगिती दिली. आता स्थगिती उठविण्यासाठी राज्यातील सर्व खासदारांनी सरकारवर दबाव आणावा. छत्रपती घराण्याचा वंशज म्हणून या वारशाला धक्का लागेल, असे कृत्य मी करणार नाही. 

"सारथी'चे अध्यक्ष व्हायला आवडेल 
छत्रपती म्हणून पहिले प्राधान्य मराठा समाजाच्या आरक्षणालाच राहील. सारथी संस्थेचे अध्यक्षपद सांभाळायला आपल्याला नक्कीच आवडेल. क्रांती मोर्चात गट-तट नसल्याचे स्पष्ट नाहीत. आंदोलनाच्या पार्श्‍वभूमीवर समाजात कोणीही भांडणे लावू नये. या संस्थेला सरकारने कोणतेही किंतु, परंतु न करता एक हजार कोटींचा निधी द्यावा. त्यातून संस्थेच्या स्थापनेचा मुलभूत हेतू साध्य करता येईल. 
.... 
 

https://scontent-sin6-2.xx.fbcdn.net/v/t39.2365-6/12726927_460738097457654_855104592_n.png?_nc_cat=103&_nc_sid=ad8a9d&_nc_ohc=L7Bqo_Br3akAX9SkCWm&_nc_ht=scontent-sin6-2.xx&oh=b372026a7359ae7dec3a509048a1eabd&oe=5F93DB27

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com