संभाजी मोरुस्कर यांनी सत्ताधारी भाजपला जागे केले?

आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर विकासकामांचा बार उडविण्याची घोषणा अंदाजपत्रकात करण्यात आली असली तरी अद्याप कामांना सुरवात न झाल्याने सत्ताधारी भाजपच्या नगरसेवकांमध्येच अस्वस्थता निर्माण झाली आहे. भाजपचे नगरसेवक संभाजी मोरुस्कर यांनी याबाबत सत्ताधारी भाजपला सजग केले.
Moruskar Sambhaji
Moruskar Sambhaji

नाशिक : आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर विकासकामांचा बार उडविण्याची घोषणा अंदाजपत्रकात करण्यात आली असली तरी अद्याप कामांना सुरवात न झाल्याने सत्ताधारी भाजपच्या नगरसेवकांमध्येच अस्वस्थता आहे. भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक संभाजी मोरुस्कर यांनी यासंदर्भात भाजपच्या नेत्यांना सजग केले. 

पूर्ण बहुमताने महापालिकेत भाजपची सत्ता आल्यानंतर विकासकामे वेगाने पुढे जातील, अशी अपेक्षा फोल ठरली. साडे चार वर्षांपासून सर्वपक्षीय नगरसेवक विकासकामांसाठी ओरड करत असताना भाजपकडून त्यावर तिखट शब्दात प्रत्युत्तर दिले जाते, परंतु माजी गटनेते व भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक संभाजी मोरुस्कर यांनी शुक्रवारी (ता.१८) विकासकामांवरून महापौर कुलकर्णी यांना धारेवर धरल्यानंतर सत्ताधारी भाजपची पंचाईत झाली.

चालू आर्थिक वर्षाचे प्रशासन, स्थायी समिती व महासभेचे अंदाजपत्रक मंजूर झाले असताना अद्यापही कामांना सुरवात नाही. पावसाळ्यात कामे बंद राहतात. पावसाळा संपल्यानंतर निवडणुकीची तयारी करावी लागणार आहे. त्यापूर्वी किमान कामांच्या कार्यारंभ आदेश ठेकेदारांना मिळणे गरजेचे असल्याचे मत श्री. मोरुस्कर यांनी मांडताना महापालिकेत सत्ता असली तरी निवडणुकीत नागरिकांना दिलेल्या आश्‍वासनांची वचनपूर्ती करावी लागणार आहे. मतदारांशी प्रतारणा करता येणार नाही. विकासकामे झालीच पाहिजे अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला. शहरात महाराष्ट्र नॅचरल गॅस कंपनीकडून मोठ्या प्रमाणात रस्त्यांची खोदाई करण्यात आली. त्याबदल्यात महापालिकेकडे तोडफोड खर्च अदा करण्यात आला आहे, त्यातून तातडीने रस्त्यांची दुरुस्तीची मागणी त्यांनी केली.

...
महापालिकेत भाजपची सत्ता असली हे मान्य असले तरी मतदारांना दिलेल्या वचनांची पूर्तता करणे महत्त्वाचे आहे. अन्यथा प्रतारणा होईल. त्यामुळे आंदोलनाची भूमिका घ्यावी लागली.
- संभाजी मोरुस्कर, माजी गटनेता, भाजप. 
..
हेही वाचा...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com