स्वच्छतेतून समता परिषदेने शहाजीराजेंच्या स्मारकाकडे वेधले लक्ष

वेरूळ येथील शहाजीराजे भोसले स्मारकांची गेल्या अनेक वर्षापासून स्वच्छता व साफसफाई झाली नव्हती त्यामुळे स्मारक चोहोबाजूंनी गाजर गवतांनी व झाडाझुडूपांनी वेढले गेले होते. अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेने दोन जेसीबी, ट्रँक्टर व वीस पदाधिका-यांनी स्मारक परिसराची साफसफाई केली आहे.
स्वच्छतेतून समता परिषदेने शहाजीराजेंच्या स्मारकाकडे वेधले लक्ष

खुलताबाद : वेरूळ येथील शहाजीराजे भोसले स्मारकांची गेल्या अनेक वर्षापासून स्वच्छता व साफसफाई झाली नव्हती त्यामुळे स्मारक चोहोबाजूंनी गाजर गवतांनी व झाडाझुडूपांनी वेढले गेले होते. अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेने दोन जेसीबी, ट्रँक्टर व वीस पदाधिका-यांनी स्मारक परिसराची साफसफाई केली आहे. 

माजी खासदार समीरभाऊ भुजबळ यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने हे स्वच्छता मोहीम अभियान राबविण्यात आले. वेरूळ येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचे आजोबा मालोजीराजे भोसले यांच्या मालकीच्या गढीवर शहाजीराजे भोसले यांच्या स्मारकाचे काम सुरू आहे.  कोट्यावधी रूपयांची विकास कामे झाले असून सार्वजनिक बांधकाम विभागाकडे विकास कामासांठी ४९ लाख रूपये पडून आहेत. गेल्या अकरा वर्षापासून स्मारकाचे काम बंद असल्याने शहाजीराजे भोसले स्मारक चोहोबाजूंनी गाजरगवतानी वेढले गेले आहे. 

रखडलेले काम आणि साफसफाई होत नसल्याने पर्यटक व भाविकांचे त्याकडे दुर्लक्ष होते  आहे. अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष मनोज घोडके, महानगर अध्यक्ष गजानन सोनवणे, जिल्हा समन्वयक निशांत पवार, कार्याध्यक्ष गणेश काळे, प्रसिध्दीप्रमुख संदीप घोडके, शहराध्यक्ष चंद्रकांत पेहरकर, शहरसचिव वामन भागवत, शहर संघटक योगेश हेकाडे,आर.बी.सोनवणे, नागेश हिवाळे , संजय माळी , विराज घोडके , गणेश निकम राहुल निकम, रामभाऊ पेहरकर,नागेश मगर,शंकर वानी, यांनी स्वत: साफसफाई केली तसेच दोन जेसीबी मशीन व ट्रँक्टरच्या साह्याने स्मारक परिसर चकाचक केला. परिसर स्वच्छ केल्यानंतर शहाजीराजे भोसले यांच्या पुतळ्यास दुग्धाअभिषेक व अभिवादन करण्यात आले.

यावेळी जिल्हाध्यक्ष मनोज घोडके म्हणाले की, शासनाच्या दुर्लक्षामुळे शहाजीराजे भोसले स्मारकाचे काम गेल्या अकरा वर्षापासून रखडले आहे. स्मारकाच्या झालेल्या कामाची हानी  झाली आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग जाणून बुजून स्मारकाचे विकास कामे सुरू करीत नाही. स्मारकाकडे दुर्लक्ष करणा-या अधिकारी कर्मचारी यांची चौकशी करून कडक कारवाई करण्यात यावी.
...
 

https://scontent.fpnq1-1.fna.fbcdn.net/v/t39.2365-6/12726927_460738097457654_855104592_n.png?_nc_cat=103&_nc_sid=ad8a9d&_nc_ohc=b3vzrNffj28AX-qzskT&_nc_ht=scontent.fpnq1-1.fna&oh=401e38a10765d3656e07f5a43ff9f8f6&oe=5FA7A1A7

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com