ऋचा आव्हाड म्हणाल्या, `मी प्लाझ्मा डोनेट करणार आहे` - Rucha Jitendra Avhad says i will donate Plazma... | Politics Marathi News - Sarkarnama

ऋचा आव्हाड म्हणाल्या, `मी प्लाझ्मा डोनेट करणार आहे`

संपत देवगिरे
रविवार, 16 ऑगस्ट 2020

कोरोनामुळे निर्माण होणा-या वेदना आणि संकट मी जवळून अनुभवले आहे. त्यामुळे कोरोनाग्रस्तांना दिलासा देने ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. मी स्वतः त्यासाठी प्लाझ्मा डोनेट करणार आहे.

नाशिक : कोरोनामुळे निर्माण होणा-या वेदना आणि संकट मी जवळून अनुभवले आहे. त्यामुळे कोरोनाग्रस्तांना दिलासा देने ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. मी स्वतः त्यासाठी प्लाझ्मा डोनेट करणार आहे. सर्वांनी या चळवळीमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन सौ. ऋचा जितेंद्र आव्हाड यांनी केले. 

राष्ट्रवादी युवक कॅाग्रेसतर्फे सिन्नर येथे राष्ट्रवादी कॅाग्रेसतर्फे मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या वाढदिवसानिमित्त कोरोना योद्ध्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी त्या बोलत होते. येथील संघर्ष ग्रुपच्या वतीने संदीप शेळके यांनी नांदूर शिंगोटे येथे हा कार्यक्रम आयोजित केला होता. सौ. ऋचा आव्हाड यांच्या हस्ते अशा वर्कर व अन्य कर्मचा-यांचा सत्कार करण्यात आला. 

जनतेत वारतांना आलेल्या संपर्कातून मंत्री जितेंद्र आव्हाड कोरोनाग्रस्त झाले होते. त्यातून त्या स्वतः देखील कोरोनाच्या उपचारासाठी दाखल झाल्या होत्या या पार्श्वभूमीवर त्या म्हणाल्या, कोरोनाची भिती बाळगू नये. त्याच्याशी लढले पाहिजे.त्यामुळेच सामाजिक भान व आपले कर्तव्य पार पाडणाऱ्या डॉक्टर, आरोग्य यंत्रणा, आशा सेविका भगिनी यांचा मला अभिमान वाटतो. या सर्वांनी समर्पक भावनेने आपले कर्तव्य पार पाडताना मानवता जोपासली आहे. त्यांच्यापासून आपण सर्वांनी प्रेरणा घेतली पाहिजे. माणुसकीला प्राधान्य दिले पाहिजे. 

सौ. आव्हाड म्हणाल्या,  अनादिकालापासून भारतीय संस्कृती जगात महान आहे. एकत्र कुटुंब पद्धती, आपुलकी, मानवता, स्नेह ही आपली वैशिष्ट्ये आहेत. काळानुरूप त्यात बदल  घडले. पूर्वी "अतिथी देवो भवो" असे म्हटले जायचे. कालांतराने त्याची जागा "सुस्वागतम"ने घेतली. पुढे त्या जागी  "वेलकम" आले. आता हळूहळू ही पाटी गळून पडली व तुमच्या - आमच्या घराच्या बाहेर "कुत्र्यापासून सावध रहा" ही पाटील आली आहे.  

समाज व आपण इतकं बदलू शकतो हीच तर खरी शोकांतिका म्हणावी लागेल. हे कमी म्हणून की काय, कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर एका दिवट्याने आपल्या कोरोनाग्रस्त सख्या आईला जिवंतपणीच स्मशानभूमीत नेवून सोडले.  हे प्रत्येकांनी वृत्तपत्रात वाचलेच आहे. मुंबई वरून शेकडो किलोमीटर पायी चालत आलेल्या भावाला पाहून घराचा दरवाजा बंद करण्यात आला, हे देखील अनुभवले . नोकरी - धंद्या निमित्ताने परगावी असणाऱ्या आपल्या माणसांना आपणच गावाच्या वेशिवरच गावबंदी केली. प्रत्येकाकडे आपण संशयाने बघत होतो आणि जणू काही मानवता, माणुसकीचा ऱ्हास झाला आहे. या सर्व प्रकारात दुसऱ्या बाजूला आशेचे किरण म्हणजे डॉक्टर, पोलिस, आरोग्य यंत्रणा, आशा सेविका भगिनी यांच्या रूपाने आपण अनुभवत आहोत. 

यावेळी जिल्हाध्यक्ष कोंडाजीमामा आव्हाड, जिल्हा परिषद सदस्या सिमांतिनी कोकाटे, राजाराम मुरकुटे, युवक कॅाग्रेसचे तालुकाध्यक्ष जयराम शिंदे, योगेश आव्हाड, अमोल हिंगे, वैभव गायकवाड, शिवम म्हस्के यावेळी उपस्थित होते.
...

https://scontent-frt3-2.xx.fbcdn.net/v/t39.2365-6/12726927_4607380974576...

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख