कोवीड केंद्रांबाबत आयुक्तांची भूमिका संशयास्पद ...

जळगाव शहरातील सफाई मक्ता ‘वॉटरग्रेस’कंपनीला देण्याबाबत भाजपमध्ये महापौर विरूध्द भाजप गटनेते, नगरसेवक यांच्या अंतर्गत वाद सुरू आहे.
Kovid Center.jpg
Kovid Center.jpg

जळगाव : महापालिकेत सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकामध्ये शहरातील सफाई मक्त्यावरून अंतर्गत वाद आहेत. आता महापालिकेतर्फे कोवीड रूग्णालयाच्या सफाई मक्त्याबाबतही वाद सुरू झाला आहे. महापालिका आयुक्तांची याबाबतची भूमिका संशयास्पद असल्याचा आरोप सत्ताधारी भाजप नगरसेवकांनी केला आहे. 

त्यामुळे महापालिकेत विविध मक्त्यावरून सत्ताधारी भाजपत असलेले वाद आता अधिक प्रमाणात चव्हाट्यावर येत आहेत. जळगाव शहरातील सफाई मक्ता ‘वॉटरग्रेस’कंपनीला देण्याबाबत भाजपमध्ये महापौर विरूध्द भाजप गटनेते, नगरसेवक यांच्या अंतर्गत वाद सुरू आहे. या मक्त्याबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नसतांना आता शहरातील महापालिकेच्या कोवीड केंद्रांचा सफाई मक्त्याचा वाद सुरू झाला आहे. याबाबत महापालिकेतील सत्ताधारी भाजपचे नगरसेवक व स्थायी समितीचे सदस्य नवनाथ दारकुंडे यांनी आयुक्तांना लेखी पत्र देवूनच विचाराणा केली आहे.

याबाबत त्यांनी आयुक्तांच्या मक्त्याबाबतच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला आहे.  याबाबत त्यांनी म्हटले आहे, कि मागील सहा महिन्यापासून जळगावमध्येही ‘कोरोना’विषाणूचा भरपूर मोठ्या प्रमाणात प्रार्दुभाव झालेला आहे. असे असतांना महापालिका आयुक्तांनी जळगाव शहरातील साफसफाईचा मक्ता देतांना विना निवीदा प्रक्रिया राबवून आपल्या अधिकारात मक्ता दिला, त्यासाठी कोरोना संसर्गाचा हवाला देण्यात आला होता. मात्र, आता कोरोना रूग्ण व संशयीत रूग्ण उपाचार घेत असलेल्या कोवीड केंद्रांच्या साफसफाईसाठी निवीदा काढण्यात आली.  दोन निविदाधारक आलेले असतांना आयुक्तांनी निविदा न उघडता आठ दिवसाची मुदत वाढवून दिली. त्यामुळे कोवीड केंद्रात साफसफाईचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. 

कोरोना रूग्णांसाठी तातडीने साफसफाईची गरज असतांना आयुक्त निविदा प्रक्रियेत वेळ घालवित आहेत. त्यामुळे ‘सफाई’च्या या दोन निविदेबाबतच्या प्रक्रियेत होत असलेल्या फरकामुळे आयुक्तांची भूमिका संशयास्पद वाटत असून याबाबत त्यानी खुलासा करावा, असेही नगरसेवक दारकुंडे यानी म्हटले आहे. सत्ताधारी गटात आता दुसऱ्या एका मक्त्याच्या वादाला तोंड फुटल्यामुळे महापालिकेत सत्ताधारी भाजपत सर्व काही आलबेल नसल्याचे चित्र उघड झाले आहे. नगरसेवकांच्या या पत्राला आयुक्त काय उत्तर देतात याकडेच आता लक्ष लागले आहे. मात्र भारतीय जनता पक्षाचे महापालिकेचे नेतृत्व करणारे नेते गिरीश महाजन सध्या तरी गप्प आहेत. 

Edited by : Mangesh Mahale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com