रितेश म्हणतो, "तळपायाची आग मस्तकात गेली!' 

उत्तर प्रदेशातील हाथरसच्या घटनेवर सबंध देशात अतिशय तीव्र भावना व्यक्त आहेत. यावर अभिनेता रितेश देशमुख देखील अतिशय संतप्त झाला आहे. त्याने या घटनेनंतर पोलिसांनी पिडीत मुलीचा मृतदेह स्वतःच अंत्यसंस्कारासाठी नेल्याचे दोन व्हिडीओ पोस्ट केले आहेत.
रितेश म्हणतो, "तळपायाची आग मस्तकात गेली!' 

नाशिक : उत्तर प्रदेशातील हाथरसच्या घटनेवर सबंध देशात अतिशय तीव्र भावना व्यक्त आहेत. यावर अभिनेता रितेश देशमुख देखील अतिशय संतप्त झाला आहे. त्याने या घटनेनंतर पोलिसांनी पिडीत मुलीचा मृतदेह स्वतःच अंत्यसंस्कारासाठी नेल्याचे दोन व्हिडीओ पोस्ट केले आहेत. या घटनेने तळपायाची आग मस्तकात गेली, अशी संतप्त प्रतिक्रीया त्याने व्यक्त केली आहे. 

काॅंग्रेस प्रवक्त्या डाॅ. हेमलता पाटील यांनी आपल्या फेसबुक पेजवर फाॅरवर्ड केलेल्या या पोस्टमध्ये रितेश म्हणतो, या देशात गरीब म्हणून जन्माला येणे पाप आहे का?. गरीब आणि त्यातही उपेक्षीत जातीत जन्मः घेणे हे महापाप आहे की काय?. गरीब व त्यात उपेक्षीत जातीतील स्त्री म्हणून जन्म घेणे तर त्याहून मोठे महापाप आहे की काय? असे प्रश्‍न पडतात. हे सर्व व्हिडीओ पाहिले तर, तळपायाची आग मस्तकात जाते. रामराज्यात रातोरात हा असा प्रकार होतो. ज्या मुलीला न्याय मिळाला पाहिजे, त्या मुलीचा मृतदेह अशा प्रकारे पोलिस स्वतःच जोर जबरदस्तीने जाळून टाकतात. 

फेसबुकवरील ही पोस्ट कॉंग्रेसच्या प्रवक्‍त्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांनी व्हायरल केली आहे. यामध्ये एका पोलिस अधिकाऱ्याचा इलेक्‍ट्रॉनिक मिडीयाच्या पत्रकारांनी बाईट घेण्याचा प्रयत्न केला आहे. त्यात हा अधिकारी म्हणतो, हे काय आहे मला माहित नाही. मी काहीही बोलु शकत नाही. मी एक तृतीय श्रेणी कर्मचारी आहे. मला बोलण्याचा अधिकार नाही. मी कोतवाल होऊ शकतो, मात्र बोलु शकत नाही. मी बाहेरचा आहे. माझी इथे ड्युटी आहे, की येथून पुढे पत्रकारांनी जाऊ नये. वारंवार त्यांना विचारणा केली जाते, मात्र हा अधिकारी शेवटपर्यंत ते मला माहित नाही, याचीच पुनरावृत्ती करतो. एकंदर हे दोन्ही व्हिडीओ आणि त्यावरील प्रतिक्रीया सर्वस्तरावर व्यक्त होणारा संतापाचे प्रतिनिधीत्व करणारे असेच आहेत. त्यामुळे तो चर्चेचा विषय ठरला आहे. 
... 
 

https://scontent-sin6-2.xx.fbcdn.net/v/t39.2365-6/12726927_460738097457654_855104592_n.png?_nc_cat=103&_nc_sid=ad8a9d&_nc_ohc=A4nhKJTjBGEAX_puSZD&_nc_ht=scontent-sin6-2.xx&oh=ca228b0220f44913c42c42037cf8fcff&oe=5F9BC427

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com