धान खरेदीमध्ये गैरव्यवहार झाल्यास कारवाई करणार

यंदाच्या आर्थिक वर्षातील खरीप हंगामातील धान, भरड धान्य खरेदीमध्ये जर गैरव्यवहार झाले असतील, तर गैरव्यवहाराची जबाबदारी निश्चित करून संबंधितांवर तात्काळ कारवाई करण्यात येईल.
धान खरेदीमध्ये गैरव्यवहार झाल्यास कारवाई करणार

नाशिक : यंदाच्या आर्थिक वर्षातील खरीप हंगामातील धान, भरड धान्य खरेदीमध्ये  जर गैरव्यवहार झाले असतील, तर गैरव्यवहाराची जबाबदारी निश्चित करून संबंधितांवर तात्काळ कारवाई करण्यात येईल, अशी माहिती अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिली. 

मंत्रालयात पणन यंदाच्या हंगामातील धान व भरडधान्य खरेदीसंदर्भात आढावा बैठक झाली. त्यावेळी श्री. भुजबळ बोलत होते.  ते म्हणाले, संबंधित  जिल्ह्यांमध्ये होणारी धान खरेदी केंद्र शासनाच्या विहित निकषांनुसार होत आहे. याबाबतची खात्री जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी करावी. धान खरेदीनंतर प्राप्त होणारा तांदूळ साठविण्यासाठी गोदामांची उपलब्धता सुनिश्चित करावी. हा तांदूळ लक्ष्य निर्धारित सार्वजनिक व्यवस्थेअंतर्गत लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याची व्यवस्था करावी. 

नाशिक जिल्ह्य़ात धान खरेदी केले जाते. मात्र तिथे मिलींग होत नाही याची दखल घ्यावी. पालघर, ठाणे, गडचिरोलीसाठी बेस गोडाऊनचा निर्णय घ्यावा. नवीन धानाच्या भरडाईचे व्यवस्थापन चांगल्याप्रकारे करावे. गुणवत्ता नियंत्रण यंत्रणा सक्षम करावी. तांदुळाची गुणवत्ता तपासणीची जबाबदारी जिल्हा पुरवठा अधिका-यांनी घ्यावी. सचिवांच्या नियंत्रणाखाली फ्लाईंग स्क्वॉड तयार करून मिलर्स व गोदामांची तपासणी करावी, असे निर्देशही श्री. भुजबळ यांनी दिले.

या आढावा बैठकीत नवीन धानाच्या भरडाईबाबतचे व्यवस्थापन, गोदामांचे व्यवस्थापन, बारदान खरेदी व पुरवठा याबाबतचे व्यवस्थापन करण्याविषयी चर्चा झाली.  धान  भरडाई करण्यासाठी मिलर्सची नेमणुक करण्यासाठी नवीन अटी व शर्ती तयार करणे, भरडाईची प्रतवारी चांगली ठेवण्याच्या अनुषंगाने उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या. 

यावेळी अन्न, नागरी पुरवठा राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम, सचिव विलास पाटील, मार्केटिंग फेडरेशनचे व्यवस्थापकिय संचालक दिलीप हळदे, आदिवासी विकास महामंडळाचे व्यवस्थापकिय संचालक नितिन पाटील, महसुल विभागाचे सहसचिव संतोष भोत्रे तसेच जिल्हा पुरवठा अधिकारी उपस्थित होते.
....
 

https://scontent.fpnq6-1.fna.fbcdn.net/v/t39.2365-6/12726927_460738097457654_855104592_n.png?_nc_cat=103&_nc_sid=ad8a9d&_nc_ohc=dXVmQy114wsAX_v2fQF&_nc_ht=scontent.fpnq6-1.fna&oh=b64dbc38265915ac7c0beb5998ecd32b&oe=5F8014A7

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com