निवृत्त शिक्षक विठ्ठल धनाईत म्हणतात, "मी आमदार होणार' 

निवृत्त शिक्षक विठ्ठल कारभारी धनाईत यांनी आपली राज्यपाल नियुक्त विधान परिषद सदस्य म्हणून नियुक्ती व्हावी अशी मागणी केली आहे. त्यासाठी त्यांनी विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांसह विविध लोकप्रतिनिधी तसेच संस्थांची शिफारसपत्र जमा केले आहेत.
निवृत्त शिक्षक विठ्ठल धनाईत म्हणतात, "मी आमदार होणार' 

नाशिक : येथील निवृत्त शिक्षक विठ्ठल कारभारी धनाईत यांनी आपली राज्यपाल नियुक्त विधान परिषद सदस्य म्हणून नियुक्ती व्हावी, अशी मागणी केली आहे. त्यांनी विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांसह विविध लोकप्रतिनिधी तसेच संस्थांची शिफारसपत्र जमा केले आहेत. लवकरच त्यासाठी राज्यपालांची भेट घेऊन, सहकारी शिक्षक व संघटनांच्या प्रतिनिधींसह निवेदन देणार आहे. माझी पात्रता विचारात घेता नियुक्ती होईल, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला आहे. 

यासंदर्भात विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी, श्री. धनाईत धोडांबे (चांदवड) येथील आहेत. ते 2007 मध्ये निवृत्त झालेले शिक्षक आहेत. त्यांचे शिक्षणसंबंधी उल्लेखनीय कार्य आहे. शिक्षकांच्या संघटनेत त्यांनी नेतृत्व केले आहे. त्यांचे संघटनात्मक काम, ज्येष्ठता, शिक्षण क्षेत्रातील कामाचा अनुभव या बाबी लक्षात घेऊन शिक्षण व शिक्षणासंबंधी प्रलंबित प्रश्‍नांच्या सोडवणुकीसाठी संघटनेच्या वतीने राज्यपाल नियुक्त कोट्यातून विधान परिषद सदस्य नेमणुकीसाठी त्यांची शिफारस करण्यात येत आहे, असे शिफारस पत्र दिले आहे. पुणे येथील महाराष्ट्र राज्य पदवीधर प्राथमिक शिक्षक व केंद्रप्रमुख सभा संस्थेच्या वतीनेही पदाधिकाऱ्यांनी संघठनेचे ज्येष्ठ मार्गदर्शक म्हणून त्यांची शिफारस केली आहे. त्यामुळे सध्या मागे पडलेला राज्यपाल नियुक्त विधान परिषद सदस्यांची चर्चा किमान नाशिक शहरात तरी, पुन्हा सुरु झाली आहे. 

यासंदर्भात श्री. धनाईत म्हणाले, महापालिका शाळेत चाळीस वर्षाच्या सेवेनंतर केंद्रप्रमुख या पदावर असतांना मी निवृत्त झालो आहे. सार्वजनिक वाचनालयासह विविध संस्थांत काम केले आहे. 2001 मध्ये पदवीधर शिक्षकांसाठी पतसंस्थेची स्थापना केली. महापालिका शिक्षण मंडळाने विविध कामांची दखल घेऊन 2004 मध्ये महापालिकेचा तसेच 2001 मध्ये सार्वजनिक वाचनालयाचा आदर्श शिक्षक पुरस्कार यांसह अनेक मिळाला आहेत. शिक्षकांच्या संगटनात्मक तसेच विकासाच्या प्रश्‍नांवर विविध स्तरावर काम केले असल्याने माझी विधान परिषदेवर नियुक्ती झाल्यास त्याचा शिक्षकांच्या व शिक्षण क्षेत्राच्या अडचणी, प्रश्‍नांची सोडवणूक करण्यासाठी निश्‍चितच उपयुक्त ठरेल. त्यामुळे आपली नियुक्ती व्हावी यासाठी राज्यापालांशी संपर्क करणार आहे. 
.. 
 

https://scontent-frt3-2.xx.fbcdn.net/v/t39.2365-6/12726927_460738097457654_855104592_n.png?_nc_cat=103&_nc_sid=ad8a9d&_nc_ohc=Bc8GGgb4Yi0AX98pX8O&_nc_ht=scontent-frt3-2.xx&oh=b46111edd06db0e5c81541cf03bc9c6a&oe=5F509EA7

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com