भाजप म्हणते, आमच्या आंदोलनामुळेच मंदिरे उघडली! - Reopening temples is BJP says It is our victory | Politics Marathi News - Sarkarnama

भाजप म्हणते, आमच्या आंदोलनामुळेच मंदिरे उघडली!

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 16 नोव्हेंबर 2020

महाराष्ट्रातील ठाकरे सरकारने धार्मिक स्थळ बंद ठेवले होते त्यामुळे भाजपा तर्फे तीन राज्यस्तरीय आंदोलन करण्यात आले त्याला आज यश आले आहे म्हणून त्र्यंबकेश्वर भाजपाच्या वतीने आरती व मिठाई वाटून आनंदोत्सव साजरा केला.

नाशिक : करोनाच्या पार्श्वभूमीवर बंद असलेले त्र्यंबकेश्वर मंदिर दिवाळी पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर आद्य ज्योतिर्लिंग त्र्यंबकेश्वर मंदिर उघडले, केंद्र शासनाने याआधीच आदेश देऊन धार्मिक स्थळ सुरू करण्याचे आदेश देण्यात आले होते. परंतु महाराष्ट्रातील ठाकरे सरकारने धार्मिक स्थळ बंद ठेवले होते त्यामुळे भाजपा तर्फे तीन राज्यस्तरीय आंदोलन करण्यात आले त्याला आज यश आले आहे म्हणून त्र्यंबकेश्वर भाजपाच्या वतीने आरती व मिठाई वाटून आनंदोत्सव साजरा केला.

`भाजप`चे अँड श्रीकांत गायधनी म्हणाले, गेल्या चार महिन्यापासून मंदिरं उघडण्यासाठी जे आंदोलन भाजपा तर्फे उभं केलं , या आंदोलनाला आणि  लढ्याला अखेर आज यश आलं आहे. दिवाळीनंतर नियमावली तयार करू, त्यानंतर मंदिरं उघडू असं म्हणणाऱ्या मुख्यमंत्र्यांना दिवाळीतच पाडव्याच्या मुहूर्तावर मंदिरे उघडण्याची सदबुद्धी भगवंतानी दिली. हिंदुत्वाचा विजय झाला. ठाकरे सरकारचा अहंकार गळून पडाला. हीच साधुसंतांची आणि भगवंताची ताकद  आहे.  या लढ्यात सहभागी झालेल्या महाराष्ट्रातील सर्व साधुसंतांचे आणि भाविक जनतेचे त्र्यंबकेश्वर भाजपा तर्फे अभिनंदन केले. या निर्णयाचं  स्वागत केले. गेल्या आठ  महिन्यांपासून देव आणि भक्तांमध्ये जी दरी तयार झाली होती, ती या पाडव्याच्या मुहूर्तावर आता मिटणार आहे. भक्ताला भगवंताच दर्शन घेता येणार आहे आणि ज्या लाखो कुटुंबाची उपजीविका या  मंदिरावर अवलंबून होती, त्यांच्या घरात चूल सुध्दा पेटणार आहे. 

भाजपा तालुकाध्यक्ष, नगरसेवक विष्णु दाबाडे, शहराध्यक्ष सुयोग वाडेकर, हर्षल भालेराव, विजय शिखरे, प्रशांत तुंगार, सचिन शुक्ल, मिलिंद धारणे, प्रविण पाटील, बाळासाहेब, श्री. अडसरे, पंकज धारणे, विराज मुळे, राजेश शर्मा, चंद्रकांत प्रभुणे, राहुल खत्री, आरती शिंदे, जयदीप शिखरे, राकेश राहणे, सुयोग शिखरे आदी उपस्थित होते.
.....
 

https://developers.facebook.com/docs/plugins/embedded-posts/?prefill_hre...

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख