आता गरजू रुग्णांनाच रेमडेसिव्हिरचा पुरवठा !

रुग्णालयांची ऑक्सिजन व रेमडेसिव्हिरची मागणी वाढत आहे. त्यामुळे शासनाच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणेच ऑक्सिजन व रेमडेसिव्हिरचा वापर करावा. औषधांचा अवास्तव वापर टाळून खऱ्या गरजूंना वितरण करण्यासाठी जिल्ह्यात शहरी व ग्रामीण भागात सोमवार पासून पथकांमार्फत नियंत्रण ठेवण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी सांगितले.
Suraj Mandhare
Suraj Mandhare

नाशिक : रुग्णालयांची ऑक्सिजन व रेमडेसिव्हिरची मागणी वाढत आहे. त्यामुळे शासनाच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणेच ऑक्सिजन व रेमडेसिव्हिरचा वापर करावा. औषधांचा अवास्तव वापर टाळून खऱ्या गरजूंना वितरण करण्यासाठी जिल्ह्यात शहरी व ग्रामीण भागात सोमवार पासून पथकांमार्फत नियंत्रण ठेवण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी सांगितले.

जिल्ह्यातील ऑक्सिजन पुरवठा व रेमडेसिव्हिरबाबत जिल्ह्यातील पथकप्रमुख प्रांताधिकारी, तहसीलदार व संबंधित अधिकाऱ्यांसोबत दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठक घेण्यात आली. तीत ते बोलत होते. अतिरिक्त जिल्हाधिकारी दत्तप्रसाद नडे, अतिरिक्त जिल्हाधिकारी तथा मालेगाव महापालिकेचे प्रभारी आयुक्त धनंजय निकम, अतिरिक्त आयुक्त प्रवीण आष्टीकर, तहसीलदार शिवकुमार आवळकंठे, प्रशांत पाटील आदी उपस्थित होते.

श्री. मांढरे म्हणाले, की जिल्ह्यातील सर्व रुग्णालयातील ऑक्सिजन बेड, व्हेंटिलेटर बेड, आयसीयू बेडबाबत माहिती संकलित केली आहे. रुग्णालयांमध्ये त्याप्रमाणे व्यवस्था अस्तित्वात आहे की नाही याची खात्री करावी, ऑक्सिजन तज्ज्ञांच्या मार्गदर्शन सूचनांनुसार योग्य रीतीने वापरला जात आहे की नाही व संबंधित रुग्णालयांची वितरण व्यवस्था, साठवणूक क्षमता यावर नियंत्रण आणि तपासणी करावी. तसेच रेमडेसिव्हिर इंजेक्शनला सध्या मोठी मागणी असून, सगळी रुग्णालये शिफारशी करीत असल्याने व तक्रारी प्राप्त झाल्याने जिल्हाधिकारी कार्यालयात औषध वाटपासाठी मध्यवर्ती कक्ष स्थापन केला आहे. या कक्षाच्या माध्यमातून जिल्ह्यात रोज प्राप्त रेमडेसिव्हिर इंजेक्शन साठा, ज्या रुग्णासाठी मागणी केला आहे, त्याच रुग्णांना दिला आहे का, याची खात्री करण्यासाठी तपासणी पथके नेमून कार्यवाही करणार आहे. ही पथके स्थापन करण्याचा प्रमुख उद्देश गरजू रुग्णांपर्यंत औषध व ऑक्सिजन पोहोचवणे हा असल्याचे जिल्हाधिकारी श्री. मांढरे यांनी स्पष्ट केले.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com