नाशिकमध्ये आता रेमडेसिव्‍हिरचा पुरवठा थेट रुग्‍णालयांना! 

रेमडेसिव्‍हिरइंजेक्शनचा पुरवठा व टंचाईबाबात प्रचंड तक्रारी येत आहे. याबाबत रुग्णांच्या नातेवाईकांचा रोष लक्षात घेता जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनीच या प्रकरणात थेट हस्तक्षेप केला आहे. यापुढे मागेल त्याला नव्हे तर गरज असेल त्यालाच पुरवठा केला जाणार आहे.
Suraj Collector
Suraj Collector

नाशिक : रेमडेसिव्‍हिर इंजेक्शनचा पुरवठा व टंचाईबाबात प्रचंड तक्रारी येत आहे. याबाबत रुग्णांच्या नातेवाईकांचा रोष लक्षात घेता जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनीच या प्रकरणात थेट हस्तक्षेप केला आहे. यापुढे मागेल त्याला नव्हे तर गरज असेल त्यालाच पुरवठा केला जाणार आहे. त्यासाठी कोविड रुग्णालयांनी मागणी नोंदविल्यावर त्या रुग्णालयास रेमडेसिव्‍हिरचा पुरवठा करण्याचे परिपत्रक काढण्यात आले आहे.  

शहर व जिल्ह्यात रेमडेसिव्‍हिर इंजेक्शनचा तुटवडा जाणवत असल्याने रुग्‍णांच्‍या नातेवाइकांची दमछाक सुरू होती. त्या मुळे जिल्‍हाधिकारी सूरज मांढरे यांनी शनिवारी अन्न व औषध प्रशासन विभागाला रेमडेसिव्‍हिर इंजेक्‍शन उपलब्‍धतेबाबत आदेश जारी केले आहेत. त्यानुसार कोविड रुग्‍णालयांना आता थेट इंजेक्‍शनचा पुरवठा होणार असून, काळाबाजार रोखण्याच्‍या अनुषंगाने रुग्‍णालयांवर महत्त्वाची जबाबदारी असणार आहे. केवळ एक किंवा दोन पुरवठादारांकडूनच व्‍यक्‍तिगत पुरवठा केला जाणार आहे. 

जिल्‍हाधिकारी मांढरे यांनी आदेशात म्‍हटले आहे, की वैद्यकीय तज्‍ज्ञांच्या प्रोटोकॉलनुसार बाधित रुग्‍णास रेमडेसिव्‍हिर इंजेक्‍शन देणे गरजेचे असल्‍यास नेमके किती इंजेक्‍शन देण्याची गरज आहे, याबाबत खात्री न करता सरसकट सहा ते सात इंजेक्‍शन आणण्याची मागणी होत आहे. या मुळे रुग्‍णांचे नातेवाईक इंजेक्‍शन खरेदीसाठी मेडिकल, होलसेल दुकानांमध्ये गर्दी करत असून, भीतीचे वातावरण निर्माण होत आहे. त्‍यानुषंगाने आता रेमडेसिव्‍हिर इंजेक्‍शन नियुक्‍त केलेल्‍या होलसेलरमार्फत थेट कोविड रुग्‍णालयांना पुरवठा केला जाईल. व्‍यक्‍तिगत पुरवठा केवळ एक अथवा दोन पुरवठादारांकडून होईल. जिल्ह्यातील रुग्‍णालयांसाठी लागणारा साठा, शिल्‍लक साठा, तसेच मागणी याबाबत दैनंदिन अहवाल घेण्यासाठी एक जबाबदार अधिकारी नेमावा. तक्रारींच्‍या निराकरणासाठी भरारी पथक नेमण्यास सांगितले आहे. जिल्ह्यातील कोविड रुग्‍णालयांमध्ये औषधाचा अनियंत्रित वापर, अनाधिकृत साठा आणि गैरवापर होण्याचे निदर्शनास आल्‍यास तातडीने कारवाई करण्याबाबत भरारी पथकास कळविण्यास सांगितले आहे. 

बॉटल जतन करावी लागणार 
संबंधित फार्मासिस्‍टनी रेमडेसिव्‍हिरची विक्री करताना इंजेक्‍शनच्‍या बॉटलवर रुग्‍णाचे नाव लिहिले जाते. संबंधित रुग्‍णालयाने हे इंजेक्‍शनच्‍या बॉटलचे जनत करावे. रुग्‍णालयाद्वारे इंजेक्‍शनचा योग्‍य वापर झाला आहे अथवा नाही, याची खातरजमा विभागामार्फत करण्याचे आदेशात नमूद केले आहे. कोरोना बाधितांकरीरिता इंजेक्‍शन वापरत असलेल्याचे प्रमाणपत्र, सोबत आधारकार्ड किंवा अन्‍य छायाचित्र असलेल्‍या पुराव्‍याची प्रत व अन्‍य आवश्‍यक कागदपत्रे जोडून एकूण मागणीपत्र पुरवठादाराकडे त्‍यांच्‍या प्रतिनिधीमार्फत पोच करण्याचे सूचविले आहे. 
....
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com