दिलासा...नाशिक जिल्‍ह्यात ६७७ पॉझिटिव्‍ह

सोमवारी (ता. २४) जिल्‍ह्यात ६७७ रुग्‍णांचे अहवाल पॉझिटिव्‍ह आले, तर एक हजार ३४९ रुग्‍णांनी कोरोनावर मात केली. ४३ बाधितांचा मृत्‍यू झाला. ॲक्‍टिव्‍ह रुग्‍णसंख्येत ७१५ ने घट झाली असून, सद्यःस्‍थितीत जिल्‍ह्यात १५ हजार २४४ बाधितांवर उपचार सुरू आहेत.
Suraj Mandhare
Suraj Mandhare

नाशिक : काही दिवसांपासून जिल्‍ह्यात लागू केलेल्‍या कठोर निर्बंधांचा परिणाम कोरोनाविषयक दैनंदिन अहवालात दिसू लागला आहे. सोमवारी (ता. २४) जिल्‍ह्यात ६७७ रुग्‍णांचे अहवाल पॉझिटिव्‍ह आले, तर एक हजार ३४९ रुग्‍णांनी कोरोनावर मात केली. ४३ बाधितांचा मृत्‍यू झाला. ॲक्‍टिव्‍ह रुग्‍णसंख्येत ७१५ ने घट झाली असून, सद्यःस्‍थितीत जिल्‍ह्यात १५ हजार २४४ बाधितांवर उपचार सुरू आहेत.

यासंदर्भात जिल्हाधिकारी सूरज मांढरे म्हणाले, गेल्या काही दिवसांत कोरोना संसर्ग आटोक्यात यावा यासाठी प्रशासनाने केलेल्या नियोजनाला चांगले यश प्राप्त झाले आहे. १९ मेस रुग्णसंख्या १८,४९३ होती, ती सध्या १३,७१४ झाली आहे. देनंदीन रुग्णसंख्या १०७३ वरून ६७७ झाली. पाॅझिटिव्हीटी दर ८.२० टक्क्यांवरून ५.७५ टक्के झाला आहे. रुग्णालयांत पुरेसे बेड उपलब्ध आहेत. प्राणवायूची मागणी वीस टक्के घटली. दहा हजार रेमडेसिव्हि्र इंजेक्शन उपलब्ध आहेत. त्यामुळे कोरोना संदर्भात दिलासा मिळाला आहे.  

सोमवारी नाशिक महापालिका क्षेत्रात अवघ्या ३१६ रुग्‍णांचा अहवाल पॉझिटिव्‍ह आला, तर नाशिक ग्रामीणमध्ये ३५०, मालेगाव महापालिका क्षेत्रात ११ रुग्‍णांना कोरोनाची लागण झाली. कोरोनामुक्‍त झालेल्‍या रुग्‍णांमध्ये सर्वाधिक एक हजार १२२ रुग्‍ण नाशिक ग्रामीणमधील आहेत. नाशिक शहरातील २०४, तर मालेगावच्‍या २३ रुग्‍णांनी कोरोनावर यशस्‍वीरीत्‍या मात केली. कोरोनामुळे झालेल्‍या मृतांमध्ये सर्वाधिक २१ मृत नाशिक महापालिका क्षेत्रातील आहेत. नाशिक ग्रामीणमध्ये १७, तर मालेगाव महापालिका क्षेत्रात पाच बाधितांचा कोरोनामुळे मृत्‍यू झाला.

सायंकाळी उशिरापर्यंत जिल्‍ह्यातील दोन हजार ३७५ रुग्‍णांना अहवालाची प्रतीक्षा होती. यात नाशिक महापालिका क्षेत्रातील एक हजार १८४, नाशिक ग्रामीणमधील एक हजार ४९, तर मालेगावच्‍या १४२ रुग्‍णांना अहवालाची प्रतीक्षा होती. जिल्‍ह्यातील रुग्‍णालये व गृहविलगीकरणात एक हजार २२७ रुग्‍ण असून, यात नाशिक महापालिका क्षेत्रातील एक हजार ७४ रुग्‍णांचा समावेश आहे. जिल्‍हा रुग्‍णालयात चार, तर डॉ. वसंत पवार वैद्यकीय महाविद्यालयात नऊ रुग्‍ण दाखल झाले. नाशिक ग्रामीणमधील १०२, तर मालेगावच्‍या ३८ रुग्‍णांचा समावेश आहे.
... 

हेही वाचा...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com