नाशिकची `मनसे` चिपळूनच्या पूरग्रस्तांच्या मदतीला धावली!

कोकण आणि विशेषतः चिपळूनला अतिवृष्टी व पूरामुळे मोठे नुकसान झाले आहे. विविध राजकीय पक्ष, संघटना त्यांच्या मदतीला पुढे येत आहेत. नाशिकहून `मनसे`चे कार्यकर्ते उद्या (ता.२७) मनसेचे युवा नेते अमित ठाकरे यांच्या उपस्थितीत या साहित्यासह मदतीसाठी रवाना होणार आहेत.
MNS Madat
MNS Madat

नाशिक : कोकण आणि विशेषतः चिपळूनला अतिवृष्टी व पूरामुळे मोठे नुकसान झाले आहे. (Heavy rain & Flood affected konkan area) विविध राजकीय पक्ष, संघटना त्यांच्या मदतीला पुढे येत आहेत. (MNS will send food & Other material) नाशिकहून `मनसे`चे कार्यकर्ते उद्या (ता.२७) मनसेचे युवा नेते अमित ठाकरे (Amit Thakre) यांच्या उपस्थितीत या साहित्यासह मदतीसाठी रवाना होणार आहेत. 

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी काल पूरग्रस्तांच्या मदतीसाठी पदाधिकारी व कार्यकर्त्यांना आवाहन केले होते. त्याला प्रतिसाद देत येथील पदाधिकाऱ्यांनी आज बिस्कीटे, तांदूळ, धान्य, कोलगेट, फरसान, महिलांसाठी सॅनीटरी पॅड, सॅनिटायझर, खाद्य सामग्री, पिण्याचे पाणी, फिनाईल यांसह विविध साहित्य जमा केले. विविध पादधिकारी आज दिवसभर त्या कामात व्यस्त होते. हे साहित्य घेऊन उद्या येथील कार्यकर्ते व पदाधिकारी चिपळूनला रवाना होणार आहेत, अशी माहिती शहराध्यक्ष अंकुश पवार यांनी सांगितले. मुर्तड पवार

आज रात्री तसेच उद्या दिवसभर मदतीसाठी साहित्य जमा केले जाणार आहेत. त्यासाठी शहराध्यक्ष अंकुश पवार, जिल्हा अध्यक्ष श्याम गोहाड, भाऊसाहेब निमसे, सत्यम खंडाळे, नितीन साळवे, रामदास दातीर, योगेश लभडे, सचिन सिन्हा, मनविसेचे शहराध्यक्ष संदेस जगताप, ललित वाघ, महिला आघाडीच्या कामिनी दोंदे, आरती खिराडकर आदींनी मदत साहित्य जमा करण्यासाठी परिश्रम घेत आहेत.
... 
हेही वाचा...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com