नाशिकला रिलायन्सचा कोरोना लसनिर्मितीसाठी प्रयत्न - Reliance praposed to Manufacturing corona vaccine; Nashik Politics  | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सांगलीकडे रवाना, पूरग्रस्त भागाची पाहणी करणार

नाशिकला रिलायन्सचा कोरोना लसनिर्मितीसाठी प्रयत्न

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 22 जुलै 2021

रिलायन्स उद्योग समूहातर्फे दिंडोरी येथे प्रस्तावित औषधनिर्मिती प्रकल्पात कोरोना लसीची निर्मिती व्हावी, याकरिता प्रयत्न करणार असल्याची माहिती राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी येथे दिली.
 

/नाशिक : रिलायन्स उद्योग समूहातर्फे दिंडोरी येथे प्रस्तावित औषधनिर्मिती प्रकल्पात (Reliance pharmaceutical project praposed in Nashik) कोरोना लसीची निर्मिती व्हावी, (they may manufacuter corona vaccine) याकरिता प्रयत्न करणार असल्याची माहिती राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई (Subhash Desai) यांनी येथे दिली.

अंबड औद्योगिक वसाहतीत एका कंपनीच्या उद्‌घाटनासाठी आले असताना ते पत्रकारांशी बोलत होते. रिलायन्स समूहाच्या प्रस्तावित औषध प्रकल्पासाठी दिंडोरीत १६० एकर जमीन देण्याची मागणी उद्योग विभागाने पूर्ण केली आहे. या प्रकल्पामुळे छोट्या-मोठ्या उद्योगांना चालना मिळून हजारो जणांना रोजगाराची संधी उपलब्ध होणार असल्याचेही श्री. देसाई यांनी सांगितले.

ते म्हणाले, बहुतांश राष्ट्रे चीनहून विविध उत्पादनांची आयात करतात. परंतु आता नाशिकमधून चीनला मशिनरी निर्यात होणार आहे. नाशिकमध्ये उद्योग क्षेत्रात वाढ होत आहे. देशात केवळ महाराष्ट्रातच शंभर टक्के उद्योग सुरू आहेत. ज्यामुळे लाखो कामगारांच्या हाताला रोजगार मिळाला आहे. मुख्यमंत्रीदेखील यासाठी प्रयत्नशील असून, ते वेळोवेळी उद्योजक व कामगारांच्या आरोग्याविषयी मार्गदर्शन करताना दिसतात. नाशिकच्या उद्योगांसंदर्भात आढावा घेण्यासाठी लवकरच स्वतंत्र वेळ काढून येईल, असे आश्‍वासनही त्यांनी या वेळी दिले.
 

‘पांजरापोळ’साठी प्रस्ताव नाही
दरम्यान, पांजरापोळच्या जागेत सिडकोची नवीन योजना प्रस्तावित आहे. त्यासंदर्भात विचारले असता, येथे नवीन एमायडीसी व्हावी, याबाबत आपल्याकडे अद्याप कोणतीही मागणी आलेली नाही. अशी मागणी येताच त्याबाबत नक्कीच सकारात्मक विचार केला जाईल, असेही मंत्री देसाई यांनी या वेळी नमूद केले.
...
हेही वाचा...

आम्ही धरण मागीतले, अजितदादांनी धरण दिले!

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख