परतफेड केलेल्या शेतक-यांवर पीककर्जात असा होतेय अन्याय, तक्रार थेट मुख्यमंत्र्यांकडे

ज्यांनी कर्जमाफीचा लाभ घेतला, त्यांचीच मागणी प्राधान्याने नोंदविली गेली आहे. त्यामुळे नियमितपणे कर्जफेड केलेल्यांवर अन्याय होतोय. हा अन्याय थांबवावा, म्हणून थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करण्यात आली आहे.
परतफेड केलेल्या शेतक-यांवर पीककर्जात असा होतेय अन्याय, तक्रार थेट मुख्यमंत्र्यांकडे

नाशिक : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेने पीककर्ज वितरणाची कार्यवाही सुरु केली आहे. मात्र यामध्ये विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांकडून कर्जमागणीची यादी पाठवितांना, ज्यांनी कर्जमाफीचा लाभ घेतला, त्यांचीच मागणी प्राधान्याने नोंदविली गेली आहे. त्यामुळे नियमितपणे कर्जफेड केलेल्यांवर अन्याय होतोय. हा अन्याय थांबवावा, म्हणून थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करण्यात आली आहे. 

यासंदर्भात राष्ट्रवादी कॅांग्रेसच्या माजी आमदार दीपिका चव्हाण यांनी मुख्यमंत्र्यांसह विविध यंत्रणांना पत्र लिहून हा अन्याय दुर करण्याची मागणी केली आहे. नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला नुकताच राज्य सरकारकडून 870 कोटी रुपयांचा कर्जमाफीचा हप्ता प्राप्त झाला आहे. या निधीतून प्राधान्याने फक्त पीककर्ज वितरण करण्यात येणार आहे. ल्यानंतर जिल्ह्यातील अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांमधे समाधानाचे वातावरण निर्माण आहे. असे असतानांच काही अटी,  शर्तीमुळे नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना हे कर्ज वाटप न करता ज्या शेतकऱ्यांना महात्मा फुले कर्जमाफी योजनेत लाभ मिळाला आहे, अशाच शेतकऱ्यांना कर्ज वाटप करण्यात येणार आहे. नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांवर अन्याय होत असल्याची भावना माजी आमदार दीपिका चव्हाण यांनी व्यक्त केली आहे. 

जिल्हा बँकेच्या एकूण ग्राहकांपैकी एक लाखाहुन अधिक शेतकरी हे नियमित कर्ज फेडणारे आहेत. कर्जमाफी झालेल्या शेतकऱ्यांना पिककर्ज हे मिळालेच पाहिजे मात्र जे नियमित आहेत त्यांना ही कर्ज मिळाले तर अश्या शेतकऱ्यांवर होनारा अन्याय थांबवता येईल. नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांवरील अन्याय थांबवता येणार आहे  याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उप मुख्यमंत्री अजित पवार, सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, पालकमंत्री छगन भुजबळ यांची भेट घेऊन कर्जमाफ़ी झालेल्या शेतकऱ्यांसह नियमित कर्ज भरणाऱ्या  शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा करण्याची मागणी केल्याची माहिती माजी आमदार दीपिका चव्हाण यांनी दिली.
....
 

https://scontent.fpnq6-1.fna.fbcdn.net/v/t39.2365-6/12726927_460738097457654_855104592_n.png?_nc_cat=103&_nc_sid=ad8a9d&_nc_ohc=XVuEtsEFldoAX-dtYPH&_nc_ht=scontent.fpnq6-1.fna&oh=b720ee9b7058dab475e483b79390bec3&oe=5F38E3A7

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com