`या`साठी ग्रामस्थांकडून आमदार सुहास कांदेचे आभार - For This reason Villegers falicitate MLA Suhas Kande, Nashik Politics | Politics Marathi News - Sarkarnama

`या`साठी ग्रामस्थांकडून आमदार सुहास कांदेचे आभार

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 28 मे 2021

नांदगाव : तालुक्यातील हिसवळ खुर्द ग्रामपंचायतीने गुरुवारी झालेल्या मासिक बैठकीत तालुक्याचे आमदार सुहास कांदे यांच्या अभिनंदनाचा ठराव मंजूर केला.

नांदगाव : तालुक्यातील हिसवळ खुर्द ग्रामपंचायतीने गुरुवारी झालेल्या मासिक बैठकीत तालुक्याचे आमदार सुहास कांदे यांच्या अभिनंदनाचा ठराव मंजूर केला.

गेल्या दीड वर्षाहून अधिक काळापासून कोरोना प्रार्दुभाव वाढत असताना प्रत्येक टप्प्यात आमदार सुहास कांदे यांनी शासकीय निधीची वाट न बघता स्वतः पदरमोड करीत जनतेच्या मदतीसाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. यापूर्वी मनमाड, नांदगाव शहरांसाठी रुग्णवाहिका असो किंवा रुग्णांसाठी लागणारी इंजेक्शन उपलब्ध करून देणे असो. आता तालुक्यात स्वखर्चातून तालुक्यातील सर्व आशासेविकांना पीपीई किट व साहित्य तसेच प्रत्येक ग्रामपंचायतीला ५० लिटर सॅनिटायझर आरोग्य केंद्रात व्हेंटिलेटर मशीन, ऑक्सिजन मशीन यासाठी सुमारे दीड कोटींहून अधिक खर्च केला. स्वखर्चातून हे सर्व करताना कोणतीही जाहिरातबाजी केली नाही. त्यामुळे हिसवळ बुद्रुक ग्रामपंचायतीच्या मासिक सभेत आमदार कांदे यांच्या या कामाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी विशेष अभिनंदनाचा ठराव सर्वसंमतीने मंजूर करण्यात आला. 

उपसरपंच संजय आहेर यांनी अभिनंदनाचा ठराव मांडला. सरपंच कैलास फुलमाळी यांनी अनुमोदन दिले. त्यावर सर्व सदस्यांनी एकमताने मंजूर केला. सदस्य नानासाहेब आहेर, नवनाथ आहेर, मनीषा आहेर, वैशाली आहेर, बेबीताई कदम, सरस्वती लोखंडे, ग्रामसेवक ईश्वर गायकवाड उपस्थित होते.
...
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख