छगन भुजबळ म्हणाले, यंदा नेते, अधिका-यांनी गणेशोत्सवात आरतीला जाणे टाळावे !

या उत्सवातून कोरोनापासून बचाव कसा करता येईल याबाबत जनजागृतीवर भर दिल्यास खऱ्या अर्थाने गणेशोत्सवाचे फलीत होईल, असे राज्याचे अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ म्हणाले.
छगन भुजबळ म्हणाले, यंदा नेते, अधिका-यांनी गणेशोत्सवात आरतीला जाणे टाळावे !

नाशिक : गणेशोत्सव साजरा करताना प्रत्येकाने कोरोना आणि संसर्गजन्य परिस्थितीचे भान ठेवणे आवश्यक आहे. उत्सव आनंदाने साजरे करा, मात्र हा उत्सव साजरा करतांना शांतता भंग न होता, भक्तीभावाने साजरा करावा. या उत्सवातून कोरोनापासून बचाव कसा करता येईल याबाबत जनजागृतीवर भर दिल्यास खऱ्या अर्थाने गणेशोत्सवाचे फलीत होईल, असे राज्याचे अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ म्हणाले. 

जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृह येथे गणेशोत्सवाच्या पूर्वतयारीसाठी झालेल्या बैठकित श्री. भुजबळ बोलत होते. ते म्हणाले की, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आलेले सण- उत्सव आपण गर्दी न करता साजरे केले आहेत. आद्यपही कोरोनाचा धोका कायम आहे.  रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असलेल्या नियमावलीचे पालन करूनच गणेशोत्सव साजरा करण्याची आवश्यकता आहे. लॉकडाऊननंतर जिल्ह्यात रुग्ण संख्या वाढली असल्याने गणेशोत्सव साजरा करतांना त्याविषयी काळजी घेणे सर्वांची जबाबदारी आहे.

श्री. भुजबळ म्हणाले, नाशिक शहरात 750 सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे आहेत. किमान दिड लाखांहून अधिक घरघुती गणेश मूर्तींची स्थापना होते. या सर्वांनी सहकार्यची भुमिका दाखविली आहे. गणपती बसविण्यासाठी मूर्तीची उंची मंडळांसाठी चार फूट, घरगुती मूर्तीची दोन फूट असावी. मंडप उभारणीबाबतच्या सूचना शासनाकडून येतील, त्यानुसार निर्णय घेण्यात येईल. गणेशोत्सवासाठी यंदा करण्यात आलेले नियम हे याच वर्षांपूरते मर्यादित असतील, पुढील वर्षी ही नियमावली असणार नाही. गणेशोत्सवासाठी परवानगी सहज उपलब्ध करून देण्यात याव्यात, असे आदेश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

सार्वजनिक मंडळाच्या आरतीसाठी लोकप्रतिनिधी आणि अधिका-यांनी स्वत:ला रोखावे. त्यामुळे कोरोनाला अटकाव करण्यास मदत होईल. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गणपती मूर्तीच्या विक्रीसाठी मोकळी जागा उपलब्ध करुन देण्यात येईल. विसर्जनासाठी कुठल्याही प्रकारची गर्दी होवू नये, यासाठी कुत्रिम तलावांचा वापर करावा, असे आवाहन श्री. भुजबळ यांनी केले. 

यावेळी महापौर सतीश कुलकर्णी, खासदार हेमंत गोडसे, आमदार सरोज अहिरे,  माजी खासदार समीर भुजबळ, जिल्हाधिकारी सुरज मांढरे, पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील, महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे, निवासी उपजिल्हाधिकारी भागवत डोईफोडे, मनपा उपायुक्त प्रदीप चौधरी उपस्थित होते. 
...
 

https://scontent.fpnq6-1.fna.fbcdn.net/v/t39.2365-6/12726927_460738097457654_855104592_n.png?_nc_cat=103&_nc_sid=ad8a9d&_nc_ohc=0lJVgWgftFsAX-GJEQp&_nc_ht=scontent.fpnq6-1.fna&oh=1cc97ba44915057c9b9e376abc7c63ee&oe=5F4CAA27

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com