शेतकरी आंदोलनाला पाठिंब्यासाठी राष्ट्र सेवा दलही मैदानात ! - Rashtra seva dal in groundin support of Delhi Farmers Agitation | Politics Marathi News - Sarkarnama

शेतकरी आंदोलनाला पाठिंब्यासाठी राष्ट्र सेवा दलही मैदानात !

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 11 फेब्रुवारी 2021

केंद्र शासनाने नव्याने मंजूर केलेले तिन्ही कृषी कायदे मागे घेण्यात यावे या मागणीसाठी गेल्या सत्तर दिवसांपासून नवी दिल्लीच्या प्रवेशद्वारावर शेतकरी धऱणे आंदोलन करीत आहेत. या आंदोलनाला देशभरातील विविध संघटना, राजकीय पक्षांनी पाठींबा दिला आहे. आता या शेतक-यांना पाठींबा देण्यासाठी राष्ट्र सेवा दलही मैदानात उतरले आहे.

नाशिक : केंद्र शासनाने नव्याने मंजूर केलेले तिन्ही कृषी कायदे मागे घेण्यात यावे या मागणीसाठी गेल्या सत्तर दिवसांपासून नवी दिल्लीच्या प्रवेशद्वारावर शेतकरी धऱणे आंदोलन करीत आहेत. या आंदोलनाला देशभरातील विविध संघटना, राजकीय पक्षांनी पाठींबा दिला आहे. आता या शेतक-यांना पाठींबा देण्यासाठी राष्ट्र सेवा दलही मैदानात उतरले आहे. राष्ट्र सेवा दल दहा लाख नागरिकांच्या सह्या संकलीत करुन राज्यपालांना पाठवणार आहेत. 

राष्ट्र सेवा दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. गणेश देवी यांनी याविषयी माहिती दिली. भारताच्या संविधान दिनी 26 नोव्हेंबर 2020 पासून शेतकऱ्यांच्या या अभूतपूर्व आंदोलनाला सुरवात झाली आहे. येत्या 26 तारखेला त्याला तीन महिने पूर्ण होतील. त्यावेळी महाराष्ट्र आणि कर्नाटकातील शेतकऱ्यांचा, शेती कामगारांचा, कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या श्रमजीवी हमालांचा, बाजार समित्यांतील अडते, व्यापाऱ्यांचा, अन्य सामाजिक संस्था आणि राजकीय संघटनांचा पाठिंबा व्यक्त करण्यासाठी राष्ट्र सेवा दलाने पुढाकार घेतला आहे. 

शेतकरी संघटना, श्रमिक संघटना, सर्व समविचारी, प्रगतीशील संघटना आणि कार्यकर्ते, विविध कला क्षेत्रातील कलाकार आणि केंद्र सरकारच्या शेती, आर्थिक धोरणाला विरोध करणा-या सर्वांच्या सहकार्याने आंदोलनाला संमती असल्याच्या दहा लाख सह्या गोळा करणार आहे. येत्या 25 फेब्रुवारीला महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या राज्यपालांना या सह्या सादर केल्या जातील.  

या सर्व संस्था, संघटना, पक्ष, व्यक्ती, आंदोलने यांनी येत्या पंधरा दिवसात या सह्या आणि संमतीसाठी कबुली विषयी सह्या संकलीत करुन आपल्या भागातील तहसिलदार किंवा जिल्हाधिका-यांना दिले जाणार आहे. संस्थेचे कार्यकारी विश्वस्त कपिल पाटील, महासचिव अतुल देशमुख अर्जुन कोकाटे, सेवा दलाचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी या मोहिमेत नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे.
...
१९४२ च्या स्वातंत्र्यसंग्रामात राष्ट्र सेवा दलाने बजावलेली ऐतिहासिक कामगिरी आपल्या राष्ट्राच्या इतिहासात सुवर्णा अक्षरात लिहली जाईल अशी होती. आजही पुन्हा एकदा तो क्षण आला आहे, यावेळची आपल्या पुढील आव्हाने तितकीच कठीण आहेत. याक्षणी राष्ट्र सेवा दलाच्या ब्रीदाला धरून प्रतिसाद मिळेल. - डॉ. गणेश देवी, अध्यक्ष, राष्ट् सेवा दल. 
...
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख